Dombivali Crime : वाढीव व्याजाचे आमिष दाखवत सेवानिवृत्त नागरिकाला गंडा, ‘एवढ्या’ लाखांचा गंडा

अधिक व्याजाचे आमिष दाखवत आणखी एकाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. दाम्पत्याने आणखी किती जणांची अशा प्रकारे फसवणूक केली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

Dombivali Crime : वाढीव व्याजाचे आमिष दाखवत सेवानिवृत्त नागरिकाला गंडा, 'एवढ्या' लाखांचा गंडा
अधिक व्याजाचे आमिष दाखवत फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 9:47 AM

डोंबिवली / 15 ऑगस्ट 2023 : वाढीव व्याजाचे आमिष दाखवत आणखी एकाला भोईर दाम्पत्याने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील सेवानिवृत्ताची 77 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम गणपत निलख असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पूजा भोईर आणि विशाल भोईर अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. या दाम्पत्यावर याआधीही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळते. अधिक व्याजाचे आमिष दाखवून या दाम्पत्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळते.

ओळखीचा फायदा घेत दाम्पत्याने गंडवले

शांताराम गणपत निलख हे 60 वर्षीय व्यक्ती डोंबिवली शिवमंदिर परिसरात राहतात. निलख यांची कल्याणमधील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या पूजा भोईर आणि विशाल भोईर यांच्याशी ओळख होती. याचाच फायदा घेत भोईर दम्पत्याने निलख यांचा विश्वास संपादन करुन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. दर आठवड्याला मोठी रक्कम हातात पडणार असल्याचे आमिष दाखवले. निलख यांनी भोईर दाम्पत्यावर विश्वास ठेवत निलख यांनी 77 लाख रुपये गुंतवले.

रामनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पैसे घेतल्यानंतर शांताराम यांना दर महिन्याला जी ठराविक रक्कम मिळणे आवश्यक होती, मात्र ती रक्कम देण्यास भोईर दाम्पत्य टाळाटाळ करु लागले. सतत तगादा लावूनही भोईर दाम्पत्य व्याजाचे पैसेही परत देत नव्हते, अन् मूळ रक्कमही परत केली नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निलख यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत दामपत्याविरोधात तक्रार दाखल केली. रामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.