Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढीव व्याजाचे आमिष दाखवत ग्राहकांना गंडा, कुठे घडली घटना?

गुंतवणुकीतून फसवणुकीचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत असताना नागरिकांनीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

वाढीव व्याजाचे आमिष दाखवत ग्राहकांना गंडा, कुठे घडली घटना?
नोटा बदलीच्या नावाखाली व्यापाऱ्याची फसवणूकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 10:21 AM

डोंबिवली : अधिक व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना लाखोंचा चुना लावल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. वर्षभरात 47 ग्राहकांची 17 लाख 36 हजाराची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनीत हा अपहार घडला आहे. याप्रकरणी श्रमसंपदा निधी कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापक सागर डोंगरे, संचालक राजेंद्र चोपडे, संचालक भास्कर बिन्नर, संचालक विष्णु दिनकर अशी गुन्हा दाखल केलेल्या संचालकांची नावे आहेत. फेब्रुवारी 2022 ते सप्टेंबर 2022 कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

गुंतवणूकदारांना वाढीव व्याजाचे आमिष दाखवले

डोंबिवली पूर्व भागातील चार रस्त्यावरील रघुवीरनगरमध्ये श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणुकीवर वाढीव व्याजाचे आमिष देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून 47 गुंतवणूकदारांनी श्रमसंपदा निधी कंपनीत आवर्त ठेव, कायमस्वरुपी ठेव, दैनंदिन ठेव योजनेत पैसे गुंतविले होते. ठेव योजनांची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदार आपल्या ठेवी परत मागू लागले. त्यावेळी संचालक विविध कारणे देऊन वेळकाढूपणा करू लागले. नऊ महिने उलटून गेले तरी संचालकांनी गुंतवणूक रक्कम व्याजासह परत केली नाही. ग्राहकांना प्रतिसाद देणेही कंपनीने बंद केले.

रामनगर पोलिसात गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात संचालकांविरुध्द तक्रार केली. डोंबिवलीतील गोपाळबागमध्ये राहणारे परशुराम मेढेकर या ज्येष्ठ नागरिकाची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. मेढेकर यांच्यासह 47 गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनीच्या संचालकांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी फसवणूक, ठेवीदारांचे हित कायद्याने गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सहाय्यक निरीक्षक योगेश सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.