नागरिकांचे गुन्हेगारापासून संरक्षण करणारे पोलीसच अडकले गुन्हेगारांच्या जाळ्यात; पुण्यात पोलिस महिलेची फसवणुक
या आर्थिक फसवणुकीला बळी पडलेली महिला येरवडा कारागृहात कार्यरत आहे. फोनवर संपर्क साधत एका अज्ञात व्यक्तीने या पोलिस महिलेची फसवणुक केली जात आहे. बदली थांबवायची असेल तर पैसे द्या असं म्हणत या भामट्याने या पोलिस महिलेची फसवणुक केली. एडीजी ऑफिसमधील क्लार्क असल्याचं सांगत अज्ञात व्यक्तीनं महिला पोलिसाकडून दहा हजार रुपये उकळले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : नागरिकांचे गुन्हेगारापासून संरक्षण करणारे पोलीसच गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले तर सर्व सामान्यांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित करणारी अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुणे(Pune) शहरातील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची(Police Constable) आर्थिक फसवणूक झाली आहे. बदलीची भिती दाखवत एका भामट्याने या पोलिस महिलेला दहा हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या आर्थिक फसवणुकीला बळी पडलेली महिला येरवडा कारागृहात कार्यरत आहे. फोनवर संपर्क साधत एका अज्ञात व्यक्तीने या पोलिस महिलेची फसवणुक केली जात आहे. बदली थांबवायची असेल तर पैसे द्या असं म्हणत या भामट्याने या पोलिस महिलेची फसवणुक केली. एडीजी ऑफिसमधील क्लार्क असल्याचं सांगत अज्ञात व्यक्तीनं महिला पोलिसाकडून दहा हजार रुपये उकळले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदली करण्याची भिती दाखवली
तक्रारदार महिला या पुण्याच्या येरवडा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य असे आहे. या पोलिस महिलेला एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. ओडीजी ऑफीसवरुन क्लार्क बोलतो अशी बतावणी फोन करणाऱ्या व्यक्तीने केली. तुमची बदली करण्यात येत असल्याचे या व्यक्तीने सांगीतले. पोलिस महिलेने फोन करणाऱ्या व्यक्तीला बदलीचे कारण विचारले. तुम्ही ज्या पॉईंटला डयुटीला होता तेथील पाच ते सहा तक्रारी आल्या असुन, डयुटी पाँईटच्या पाच मुलींना सस्पेंड करण्यात येत असल्याची भिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दाखवली.
गुगल पे खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगीतले
ओडीजी साहेबांशी बोलून तुमच्या बदलीबाबत काही तरी मार्ग काढतो. तुम्ही माझ्या गुगल पे खात्यावर दहा हजार रुपये ट्रान्सफर करा असे सांगीतले. पोलिस महिलेने मी पैसे देऊ शकत नाही असे सांगीतले. त्यावर आरोपीने तुमची ऑर्डर काढण्यात येईल, ऑर्डर टाईप करत आहे. बाकीच्या चार मुलींची ऑर्डर टाईप केली आहे असे सांगत त्यांना भिती दाखवली. बदली होईल या भितीने पोलिस महिलेने आरोपीच्या गुगल पे खात्यावर दहा हजार ट्रान्सफर केले. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीता शोध सुरु केला आहे.