आम्ही पोलीस आहोत, दागिने घालून फिरू नका.. असे म्हणायचे पण थोड्याच वेळात दागिने गायब व्हायचे…

ऑगस्ट 2022 मध्ये दोन जणांची जेलरोड परिसरील लोखंडे मळा भागात हातातील सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढत धूम ठोकली होती.

आम्ही पोलीस आहोत, दागिने घालून फिरू नका.. असे म्हणायचे पण थोड्याच वेळात दागिने गायब व्हायचे...
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 5:01 PM

नाशिक : पोलीस असल्याची बतावणी देत नाशिकच्या शहर पोलीसांनी (Nashik City Police) इराणी टोळीतील एका भामट्याला अटक केली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे पोलीस असल्याचे सांगत (Fake Police) ते वयोवृद्धांना दागिने घालून फिरू नका, असे सांगून हातचलाखी करायचे. काही क्षणातच दागिने लंपास करून पसार व्हायचे. यासाठी इराणी टोळी असल्याचे पोलीसांना नागरिकांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार मालेगाव पोलीसांच्या शहर पोलीसांनी इराणी टोळीतील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. सादिक अली राहत अली सय्यद असे त्याचे नाव असून मालेगाव येथील दरेगाव शिवारात तो राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये दोन जणांची जेलरोड परिसरील लोखंडे मळा भागात हातातील सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढत धूम ठोकली होती.

जबरी चोरीचा गुन्हा नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या तपासात या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

सादिक अली राहत अली सय्यद याने तीन गुन्ह्यात २ लाख २२ हजार ५०० रुपयांचे ५० ग्रॅम सोने चोरले होते ते देखील हस्तगत केले आहे.

समांतर तपास सरू असताना अंमलदार प्रवीण वाघमारे यांना संशयित मालेगावात असल्याची माहिती मिळाली होती.

वाघमारे यांच्या माहितीवरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी गुन्ह्याचा उलगडा करत एकाला अटक केली असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे, त्यात इराणी टोळी असल्याचा संशय पोलिसांना देखील होता.

सोनसाखळीच्या वाढत्या घटना बघता नगरिकांचा रोष वाढत चालला होता, पोलीसांच्या कामगिरीवर देखील नाराजी व्यक्त केली जात होती, मात्र इराणी टोळीचा एक धागा पोलीसांच्या हाती लागला आहे.

त्यामुळे येत्या काळात नाशिक शहर पोलीस सोनसाखळी चोरीच्या घटना रोखू शकतील का याकडे शहराचे लक्ष लागून आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.