Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मित्राचा गळा चिरला, रक्त प्यायला, खळबळजनक घटनेने पोलीसही चक्रावले !

पत्नी आणि मित्रामध्ये अफेअर सुरु असल्याचा पतीला संशय आला. यातून पतीने मित्रासोबत जे केलं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले.

आधी मित्राचा गळा चिरला, रक्त प्यायला, खळबळजनक घटनेने पोलीसही चक्रावले !
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 12:22 PM

चिक्काबल्लापूर : कर्नाटकात संशयातून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. घटना उघड होताच पोलिसांसह सर्वच चक्रावले. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने आपल्या मित्राचा गळा चिरला. मग त्याचे रक्त प्यायला. पोलिसांनी माथेफिरु आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील चिक्काबल्लापूरमध्ये ही घटना घडली. ही भयंकर घटना रस्त्यावरील एका बघ्याने मोबाईलमध्ये कैद केली आहे. विजय असे अटक आरोपीचे नाव आहे.

पत्नीसोबत मित्राचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता

आरोपी विजय आणि पीडित मारेश दोघेही चांगले मित्र होते. मारेश आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय विजयला होता. यात संशयातून विजयने मारेशवर जीवघेणा हल्ला केला. विजयने मारेशला यावर चर्चा करण्याच्या बहाण्याने बोलावले. मग त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. तरीही त्याचा राग शांत झाला नाही. गळा चिरल्यानंतर तो रक्तही प्यायला. घटनास्थळी बघ्यांची गर्दा जमली होती. मात्र कुणीही तरुणाला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही.

व्हिडिओ व्हायरल होताच आरोपीला अटक

घटनास्थळी उपस्थित एका नागरिकाने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि आरोपीला अटक केली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मारेशवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी विजय विरोधात केंचरलाहल्ली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.