मित्रांसोबत ऋषिकेशला फिरायला गेला, मात्र घरी परतलाच नाही, पोलीस तपासात जे उघड झाले त्यानंतर सर्वच हादरले !

चौघे मित्र दिल्लीहून हरिद्वार आणि ऋषिकेश फिरायला गेले होते. मात्र त्यापैकी तिघेच घरी परतले. चौथा मित्र गायब होता. पोलिसांनी चौथ्याचा शोध घेतला असता भयंकर घटना उघडकीस आली आहे.

मित्रांसोबत ऋषिकेशला फिरायला गेला, मात्र घरी परतलाच नाही, पोलीस तपासात जे उघड झाले त्यानंतर सर्वच हादरले !
क्षुल्लक वादातून मित्राने मित्राला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 6:46 PM

दिल्ली : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. क्षुल्लक वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तिघांनाही अटक केली आहे. आरोपींनी हत्या करुन मृतदेह कालव्यात फेकला. आकाश शर्मा असे मयत तरुणाचे नाव आहे. क्षुल्लक वादातून ही हत्या घडल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी कालव्यातून आकाशचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

मित्रांसोबत दिल्लीला फिरायला गेला होता

आकाशसह चार मित्र दिल्लीहून हरिद्वार आणि ऋषिकेश फिरायला गेले होते. मात्र रस्त्यातच आकाशचे मित्रांसोबत काही कारणातून भांडण झाले. यानंतर मित्रांनी त्याची हत्या केली आणि मृतदेहाचे हात बांधून कालव्यात फेकला. हरिद्वार, ऋषिकेश फिरुन आकाशचे मित्र घरी परतले तेव्हा आकाश त्यांच्यासोबत नव्हता. घरच्यांनी आकाशबाबत विचारणा केली असता मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आकाशच्या घरच्यांना त्याच्यासोबत काही चुकीचं घडल्याची शंका आली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली.

क्षुल्लक वादातून मित्रानी संपवले

पोलिसांनी मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. आकाशसोबत त्यांचा काही कारणातून वाद झाला. यातून त्याची हत्या करुन मृतदेह कालव्यात फेकल्याचे आरोपींनी पोलीत चौकशीत सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कालव्यातून आकाशचा मृतदेह बाहेर काढला. आकाशच्या डोक्याला जखम होती आणि त्याचे हात बांधले होते. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.