प्लास्टिक पिशवीत लघवी करून त्याच हातांनी फळविक्री…. डोंबिवलीतील किळसवाण्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

अनेकांना रस्त्यावरील गाड्यांवरून भाज्या, फळं विकत घेण्याची सवय असते. बाजारातही अनेक फळविक्रेते असतात. पण ते सर्वच जण स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळतात, हायजीनकडे लक्ष देतात की नाही हे मात्र लोक बघत नाहीत.

प्लास्टिक पिशवीत लघवी करून त्याच हातांनी फळविक्री.... डोंबिवलीतील किळसवाण्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 8:50 AM

अनेकांना रस्त्यावरील गाड्यांवरून भाज्या, फळं विकत घेण्याची सवय असते. बाजारातही अनेक फळविक्रेते असतात. पण ते सर्वच जण स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळतात, हायजीनकडे लक्ष देतात की नाही हे मात्र लोक बघत नाहीत. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये एका ज्यूस सेंटरमधून ज्यूसमधून मानवी मूत्र मिसळून दुकानदार ग्राहकांना देत असल्याचे उघड झाले होते. उत्तर प्रदेशातील या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले, लोकंही संतापले. मात्र हे प्रकरण अद्याप ताजं असतानाच महाराष्ट्रातील मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंबिवलीतूनही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

किळसवाण्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

डोबिवलीतील निळेज गावात ही किळसवाणी घटना घडली आहे. निळजे गावातील एक फळविक्रेता प्लास्टिक पिशवीत लघुशंका करून त्याच हातांनी फळं विकत असल्याचा एक किळसावाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामुळे शहरात संतापाचे वातावरण आहे. या व्हिडिओमध्ये हा फळविक्रेता एका प्लॅस्टिकच्या पिशवित लघुशंका करून ती पिशवी तेथेच ठेवून देतो व त्याच हाताने तो फळविक्री करत असल्याचे दिसत आहे.ही घटना उघड झाल्यावर संतप्त नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ककठोर भूमिका घेत त्या फळविक्रेत्याला जाब विचारत मारहाण केली आणि अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

वारंवरा तक्रार करूनही, पोलीस कारवाई करूनही फेरीवाले हटत नसल्याने अखेर नागरिक संतापले. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत परिसरातील फेरीवाल्यांच्या गाड्यांची तोडफोड केली तसेच हे किळसवाणे कृत्य करणाऱ्या फळवाल्याला चोपही दिला. मानपाडा पोलिसांनी त्या फळविक्रेत्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या डोंबिवलीमध्ये तणावपूर्ण वातावरण असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्येही घडला होता किळसवाणा प्रकार

उत्तर प्रदेशातून धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ज्यूस सेंटरमधून ज्यूसमधून मानवी मूत्र मिसळून दुकानदार ग्राहकांना देत होता. लोकांना ज्यूसची चव बदलल्याचे जाणवले. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला पकडून जाब विचारत चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून मानवी मूत्र जप्त करण्यात आले. गाझीयाबाद शहरातील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथील लोनी बॉर्डरवरील एका ज्यूस सेंटरचा दुकानदार व त्याचा अल्पवयीन सहकारी ज्यूसमध्ये मानवी मूत्र टाकत होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी दुकानदाराची चौकशी केली. परंतु तो उत्तर देऊ शकला नाही. अखेर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मूत्र असलेला एक कॅन जप्त करण्यात आला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.