Gangrape | परराज्यातून आलेल्या अल्पवयीन तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

Gangrape | परराज्यातून आलेल्या अल्पवयीन तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 7:08 AM

औरंगाबाद: सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत वाराणसीहून आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Gang rape of a girl from Varanasi near Aurangabad railway station)

पीडित तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादेत आली होती. पण ही तरुणी रस्ता चुकली त्यामुळे तिची आणि नातेवाईकांची भेट होत नव्हती. त्यावेळी तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी  रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा घाटी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, परराज्यातून सांस्कृतिक राज्यधानी म्हणवणाऱ्या औरंगाबादेत आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कारासारखा अत्यंत घृणास्पद प्रकार होणं ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या प्रकरणी पीडित तरुणीला न्याय देण्याचं आव्हान आता औरंगाबाद पोलिसांसमोर आहे.

पैठण तालुक्यात शेतवस्तीवर सामूहिक बलात्कार

यापूर्वी 8 डिसेंबर रोजी शेतवस्तीवर राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. पैठण तालुक्यातील थेरगावच्या पाचोड शिवारात ही घटना घडली होती. याप्रकरणात पाचोड पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

घरात नेटवर्क नसल्यामुळे संभाषणास अडथळा येत होता. त्यामुळे पीडित मुलगी घराबाहेर येऊन मोबाईलला नेटवर्क शोधत होती. त्याचवेळी दोन तरुणांनी तिचं तोंड दाबून तिला शेतात घेऊन जात बलात्कार केला. या घडलेल्या घटनेबाबत जर कोणाला सांगितले तर तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर त्या दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र या अल्पवयीन मुलीने रडत रडत घडलेला सर्व प्रकार सकाळी तिच्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या:

नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या

पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना

Gang rape of a girl from Varanasi near Aurangabad railway station

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.