Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र प्रदेशात माणूसकीला काळीमा; अल्पवयीन मुलीवर 80 नराधमांचा तब्बल 8 महिने अत्याचार

गुंटूर : आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका अल्पवयीन मुलीवर 80 जणांनी बलात्कार (Rape) केला. 8 महिने अल्पवयीन मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य सुरूच होते. वास्तविक अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात (prostitution) करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी 19 एप्रिल रोजी गुंटूर येथून अल्पवयीन मुलीची (Minor girls) […]

आंध्र प्रदेशात माणूसकीला काळीमा; अल्पवयीन मुलीवर 80 नराधमांचा तब्बल 8 महिने अत्याचार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 6:37 PM

गुंटूर : आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका अल्पवयीन मुलीवर 80 जणांनी बलात्कार (Rape) केला. 8 महिने अल्पवयीन मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य सुरूच होते. वास्तविक अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात (prostitution) करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी 19 एप्रिल रोजी गुंटूर येथून अल्पवयीन मुलीची (Minor girls) सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आसून इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. तर या घटनेतील मुख्य आरोपी सवर्णा कुमारीची पोलिसांनी ओळख पटवली आहे.

वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले

पोलिसांनी सांगितले की, जून 2021 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात आरोपी सवर्णा कुमारीची हॉस्पिटलमध्ये पीडितेच्या आईशी ओळख झाली. दरम्यान, अल्पवयीन आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर सवर्णा कुमारी या अल्पवयीन मुलीला घेऊन तिच्या घरी गेली. त्यावेळी, मुलीच्या वडिलांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला नाही. पीडितेला सवर्ण कुमारीने दत्तक घेतले होते. त्यानंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.

पहिली अटक जानेवारीत

यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सवर्णा कुमारीची ओळख पटवली. तर याप्रकरणी पहिली अटक जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. मंगळवार 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम विभाग पोलिसांनी बी. टेकच्या विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली आहे. आरोपी आणि पीडितेची चौकशी केल्यावर पोलिसांना हे वेदनादायक आणि धक्कादायक वास्तव समोर आले.

एकाही आरोपीला सोडले जाणार नाही

तसेच याप्रकरणी गांभीर्याने चौकशी करण्यात येच असून तपास सुरू आहे. तसेच आणखीन आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणीतील एक आरोपी सध्या लंडनमध्ये आहे. याप्रकरणी एक कार, 53 मोबाईल, 3 ऑटो आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर यामध्ये सहभागी असलेल्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा! अजून कुठे कुठे गुन्हे दाखल?

Raghunath Kuchik Case Pune: तर शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करीन, रघुनाथ कुचिक यांनी दबाव टाकत धमकी दिल्याचा पीडीत तरुणीचा आरोप

Nanded | कुख्यात गुंड रिंदानं मलाही 10 कोटींची खंडणी मागितली, खा. चिखलीकरांचा खळबळजनक आरोप