धक्कादायक, अनैतिक संबधाला अडथळा ठरणाऱ्या युवकाचा खून, पोलिसांनी एका वर्षानंतर आवळल्या आरोपीच्या मुसक्या

अनैतिक संबंधाना अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा गंगापूर पोलिसांनी लावला आहे. (Amalner Murder Case)

धक्कादायक, अनैतिक संबधाला अडथळा ठरणाऱ्या युवकाचा खून, पोलिसांनी एका वर्षानंतर आवळल्या आरोपीच्या मुसक्या
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 11:03 AM

औरंगाबाद: जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अमळनेर गावातील धक्कादायक खून प्रकरणाचा छडा लावण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाना अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा गंगापूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी सचिन पंडित आणि पप्पू बुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक सुरवसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. (Gangapur Police  arrested two person for Ganesh Misal Murder)

काय आहे प्रकरण?

गंगापूर तालुक्यातील अमळनेर गावातील गणेश मिसाळ हा युवक मागील वर्षी बेपत्ता झाला होता. त्यांनंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी संशयावरुन सचिन पंडित याकडे चौकशी केली असता. त्याने खून प्रकरणाची कबुली दिली. आरोपी सचिन पंडित याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती गणेश मिसाळ याला मिळाली होती. यानंतर गणेश मिसाळचा अनैतिक संबंधाना अडथळा होऊ नये म्हणून सचिन पंडितने त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गावातील एका शेतात पुरला. (Gangapur Police  arrested two person for Ganesh Misal Murder)

सचिन पंडित याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. गंगापूर पोलिसांनी यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं गणेश मिसाळला पुरलेल्या ठिकाणी खोदकाम केले. या ठिकाणी मृत मिसाळ याचा सांगाडा आढळून आला. गंगापूर पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला असून वैद्यकिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. (Gangapur Police  arrested two person for Ganesh Misal Murder)

गणेश मिसाळ खून प्रकरण गंगापूर पोलिसांनी सचिन पंडित आणि पप्पू बुट्टे या दोघांना संशयित म्हणून अटक केली आहे. एका वर्षानंतर बेपत्ता झालेल्या गणेश मिसाळ याचा खून झाल्याचे उघड झाल्यामुळे गावात खळबळ माजली.गंगापूर पोलीस ठाण्याचे अशोक सुरवसे यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या: 

हायवाखाली ऑटो आला अन् अक्षरश: चुराडा झाला! गंगाखेडमध्ये भीषण अपघात, चार जण जागीच ठार

हिंगणघाट जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात: उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

(Gangapur Police  arrested two person for Ganesh Misal Murder)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.