जिच्यासोबत लग्न करण्यासाठी पॅरोल मागितला, तिनेच केला दुसऱ्याशी निकाह; अबू सालेम बनला उल्लू?

| Updated on: Jan 10, 2024 | 12:57 PM

संपूर्ण गुन्हेगारी विश्वाला हादरवणारा, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सध्या तुरूंगातील कोठडीची हवा चाखतोय. तुरुंगात असलेल्या गँगस्टर अबू सालमेच्या प्रेयसीने त्याची साथ सोडत दुसऱ्याच व्यक्तीशी संसार थाटला आहे.

जिच्यासोबत लग्न करण्यासाठी पॅरोल मागितला, तिनेच केला दुसऱ्याशी निकाह; अबू सालेम बनला उल्लू?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 10 जानेवारी 2024 : संपूर्ण गुन्हेगारी विश्वाला हादरवणारा, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सध्या तुरूंगातील कोठडीची हवा चाखतोय. गुन्हेगारी विश्वातील मोठं नाव असणाऱ्या अबू सालेमला वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला आहे. गँगस्टर अबू सालेम याला तिसऱ्यांदा (त्याच्या) पार्टनरने डावलल्याचे समोर आले आहे. तुरुंगात असलेल्या गँगस्टर अबू सालमेच्या प्रेयसीने त्याची साथ सोडत दुसऱ्याच व्यक्तीशी संसार थाटला आहे. आत्ता त्याची साथ सोडून गेलेली ही प्रेयसी मुंब्रा येथील रहिवासी आहे.

काही वर्षांपूर्वी अबू सालेम हा सुनावणीसाठी ट्रेनद्वारे प्रवास करत असताना ही महिला त्याच्याशेजारी बसलेली असल्याचा फोटो प्रसिद्ध झाल्यावर ती बरीच चर्चेत आली होती. एका वृत्तपत्रात त्या दोघांचा फोटो छापून आला होता. दोन वर्षांनी, २०१८ साली अबू सालेमने त्याच महिलेसोबत लग्न करण्यासाठी पॅरोलही मागितला होता. तेव्हा त्यांच्या नात्याची पुष्टी झाली होती. मात्र सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र आता त्याच्या या प्रेयसीने ५ जानेवारी रोजी दुसऱ्या व्यक्तिसोबत लग्न करत संसार थाटला.

कारागृहात शिक्षा भोगतोय अबू सालेम

अबू सालेम सध्या पनवेलच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात 25 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याचे 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला सुमैरा जुमानीशी लग्न झाले होते, परंतु तो तुरुंगात असताना तिने त्याला घटस्फोट दिला. नंतर त्याचं नाव बॉलीवूड अभिनेत्री मोनिका बेदीशी जोडलं गेलं, तिचे त्याच्यासोबत पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात आले. दुस-यांदा गाठ बांधल्यावर त्याच्या ज्या काही आशा होत्या त्या धुळीला मिळाल्याचे दिसले.

5 जानेवारीला प्रेयसीने केले दुसऱ्याशी लग्न

तर 2016 साली अबू सालेम सोबत जिचा फोटो दिसला होता, त्या प्रेयसीने आता त्याची साथ सोडली आहे. 5 जानेवारी रोजी तिने मुंब्रा येथील एका मॅरेज हॉलमध्ये दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. तिच्या लग्नाची बातमी पसरल्यानंतर तिने सालेमला सोडलंय की तिने लग्न करण्यामागे आणखी दुसरं काही कारण आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींचा असा दावा आहे की, दावा आहे की तिने अधिकृतपणे सालेमशी लग्न केले नव्हते. पण काही वर्षांपूर्वी अशीही बातमी आली होती की 2014 साली या जोडप्याने चालत्या ट्रेनमध्ये एका काझीच्या मदतीने निकाह केला होता. आणि ते अधिकृतपणे लग्न करण्याच्याही प्रयत्नात होते, अशी चर्चा सुरू होती. पण तुरुंग अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने अबू सालेम याला पॅरोल न देण्यास नकार दिल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

अखेर लग्नं होण्याची कोणतीच आशा दिसत नसल्याने त्या महिलेने सालेमची वाट पाहण्याऐवजी, सेटल होण्याचा निर्णय घेतला असावा. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरल्यानंतर २५ वर्षांची शिक्षा झालेला सालेम, त्याचे बहुतांश आयुष्य तुरूंगातच घालवेल. त्यामुळे त्याची वाट पाहत झुरण्याऐवजी, तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंब्रा येथे झालेल्या त्या महिलेच्या लग्नात मुंब्रा आणि शहरातील इतर भागातील नामवंत राजकीय नेते, व्यापारी आणि अभ्यासकांनी हजेरी लावली होती. सालेमला या लग्नाची कल्पना आहे का, असा प्रशनही आता उपस्थित झाला असून, त्याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.