‘जास्त दिवस जिवंत राहणार नाहीस तू..’ सलमानच्या घरावर फायरिंग करणारा गँगस्टर US मधून करतोय शूटर्सची भरती, धक्कादायक माहिती समोर
सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती करत आहे. त्याचे काही चॅट्स समोर आले आहेत.
अभिनेता सलमान खा याच्या घरावर सुमारे महिन्याभरापूर्वी गोळीबार करण्यात आला होता. दोन हल्लेखोरांनी त्याच्या घरावर गोळीबार केला आणि ते फरार झाले. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या हल्ल्याची जबाबादारी घेतली होती. अमेरिकेत बसून त्याने या हल्ल्ल्याचे नियोजन केले होते. आता त्याच्या संदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेत बसून सलमान खानच्या बंगल्यावर गोळीबार करवणारा हा गँगस्टर नेमबाजांची ऑलाइन भरती करत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीने नेमबाजांचा नवा स्लीपर सेल तयार केला आहे. लॉरेन्स बिश्नोई यांचा भाऊ अनमोल बिश्नोई अमेरिकेत बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती केली आहे. बिश्नोई टोळीने बिहारमध्ये शेकडो नेमबाजांची भरती केली आहे. भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या बिहारच्या भागात अनेक नेमबाजांची भरती करण्यात आली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानवर हल्ला करणाऱ्या अनमोल बिश्नोईने बिहारमधील एका मुलासोबत केलेले चॅट समोर आले आहे. यामध्ये अमेरिकेत बसलेला अनमोल बिश्नोई हा बिहारमधील त्या तरूणाचाचा स्लीपर सेल म्हणून वापर करून त्याला टोळीसाठी काम करण्याचे धमकावण्याते, गोळीबार करण्याचे आदेश देताना दिसला.
देशभरात उभं केलं नेटवर्क
पंजाब, हरियाणाच नव्हे, तर बिश्नोई टोळीने शूटर्सचे संपूर्ण भारतात नेटवर्क तयार केले आहे. बुधवारीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अनेक राज्यांमध्ये (बिहार, यूपी, राजस्थान, हरियाणा, पंजाब) छापे टाकून बिश्नोई-गोल्डी ब्रार टोळीच्या पॅन इंडिया मॉड्यूलचा पर्दाफाश केला. सलमानच्य़ा घरावर गोळीबार कणरारे ते दोन हल्लेखोर हे बिहारमधीलच होते. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, 2023 पासून बिहार पोलिसांनी नेपाळ सीमेला लागून असलेल्या पश्चिम चंपारण आणि पूर्व चंपारणमध्ये बिश्नोई टोळीशी संबंधित अनेक नेटवर्कचा पर्दाफाश, करण्यास सुरुवात केली होती. अंडरवर्ल्डच्या बी कंपनीत ऑनलाइन भरती झाल्याचा खुलासा झाल्यानंतर ते सक्रिय झाले आहेत.
फायरिंगचा मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई
खरंतर सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पोलिसांच्या तपासातही त्याचा सहभाग समोर आला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली. या प्रकरणात अनमोल आणि लॉरेन्स बिश्नोई यांची वॉन्टेड आरोपी म्हणून नावे आहेत. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई कॅनडामध्ये राहतो आणि तो वारंवार अमेरिकेत येत असतो. मात्र, ज्या फेसबुक पोस्टद्वारे त्याने गोळीबाराची जबाबदारी घेतली होती, त्याचा आयपी ॲड्रेस पोर्तुगालचा असल्याचे समोर आले आहे.