Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arun Gawli | महिनाभरात डॅडी पुन्हा बाहेर, अरुण गवळीला 28 दिवसांची फरलो रजा मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला आज 28 दिवसांचा फरलो मंजूर केला.

Arun Gawli | महिनाभरात डॅडी पुन्हा बाहेर, अरुण गवळीला 28 दिवसांची फरलो रजा मंजूर
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 9:27 PM

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांचा फरलो (Arun Gawli Granted 28 days Furlough Leave) मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला आज (7 जुलै) हा फरलो मंजूर केला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला आहे (Arun Gawli Granted 28 days Furlough Leave).

फरलो रजा मिळावी म्हणून 30 नोव्हेंबर 2019 ला गवळीने तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याच्या अर्जावर सुनावणी झाली नाही. सोबतच अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे. परंतु, दिलेल्या मुदतीत त्याने कुठल्याही नियमांचा भंग केला नाही आणि दिलेल्या कालावधीत तो तुरुंगात हजर झाल्याचा युक्तिवाद गवळीच्या वकिलांनी केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

वकिलाचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने गवळीला 28 दिवसांची फरलो रजा मंजूर केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अरुण गवळीचा पॅरोल एकदा वाढवण्यात देखील आला होता. मुंबईतील शिवसेना नेत्याच्या खुनाच्या आरोपात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

आधी पत्नीच्या आजारपणाचं कारण, नंतर लॉकडाऊनमुळे अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये मुदतवाढ

अरुण गवळीची पत्नी गंभीर आजारी असल्याने न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार, त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागपूरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

दरम्यान, अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी 8 मे रोजी विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं.

Arun Gawli Granted 28 days Furlough Leave

काय आहे कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी 30 लाखांची रक्कम मागितली.

सदाशिवने 30 लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली. अरुण गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसंडेकरांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितलं. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या साथीदाराकडे दिलं. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी प्रत्येकी 20 हजार रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही देण्यात आला होता.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार गिरीने अशोक कुमार जयस्वार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसंडेकरांवर लक्ष ठेवलं. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने पकडण्यात आलं. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.

Arun Gawli Granted 28 days Furlough Leave

संबंधित बातम्या :

पुढील 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा, कोर्टाचे अरुण गवळीला आदेश

Lockdown : अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.