Ghatkopar Horading collapse : घाटकोपर दुर्घटना प्रकरणात मुख्य आरोपी भावेश भिंडेला100 वेळा दंड, कारवाईमुळे काळ्या यादीतही नाव

13 मे रोजी घाटकोपर येथ पेट्रोल पंपावर भलमोठ्ठ होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणात नवे अपडेट समोर आले आहेत. या दुर्घटनेप्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली असून सध्या तो पोलीसांच्या ताब्यात आहे.

Ghatkopar Horading collapse : घाटकोपर दुर्घटना प्रकरणात मुख्य आरोपी भावेश भिंडेला100 वेळा दंड, कारवाईमुळे काळ्या यादीतही नाव
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 8:03 AM

13 मे रोजी घाटकोपर येथ पेट्रोल पंपावर भलमोठ्ठ होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणात नवे अपडेट समोर आले आहेत. या दुर्घटनेप्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली असून सध्या तो पोलीसांच्या ताब्यात आहे. त्याच्याच संदर्भात ही अपडेट आहे. मुख्य आरोपी भावेश भिंडेवर 100 पेक्षा जास्तवेळा कारवाई करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने भावेश भिंडे याा 100 पेक्षा अधिक वेळा दंड ठोठावल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. तसेच या कारवायांमुळे त्याला काळ्या यादीतही टाकल्याचा संशय असून त्यामुळेच भावेश भिंडे है स्वत:च्या नावावर नसलेल्या एका कंपनीद्वारे काम करत होता असे वृत्त असून याबाबत पोलीस अधिक तपास करत होता.

गेल्या आठवड्यात मुंबईत वादळी वारे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यावेळी घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपजावळ असलेले सुमारे 100 फुटांचं भलमोठं होर्डिंग पेट्रोलपंपावर कोसळलं आणि अनेक माणसं, रिक्षा, गाड्या, ट्रक त्याखाली दबल गेले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर, हे होर्डिंग ज्या कंपनीद्वारे लावण्यात आलं होतं, त्या कंपनीचा मालक भावेश भिंडे फरार झाला होता. दोन दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी त्याल राजस्थानच्या जयपूर येथून अटक केली होती. सध्या त्याचीच चौकशी सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भावेश भिंडे हे 1998 सालापासून या व्यवसायात असून महापालिकेने त्याला आतापर्यंत १०० हून अधिक वेळा दंड ठोठावला आहे. जाहिरात फलक लावल्याप्रकरणी या दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय त्याच्याविरोधात बलात्काराच्या एका गुन्ह्यासह एकूण 6गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी चार गुन्हे मुलुंड व दोन गुन्हे सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याशिवाय जाहिरात फलक पडून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी सातवा गुन्हा पंतनगर पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केला आहे.

भावेश भिंडे कसा फरार झाला ?

17 निष्पाप नागरिकांचा मृ्त्यू आणि अनेक लोकं जखमी होण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डिंग दुर्घटनेबद्दल कळताच भावेश भिंडेने मुंबईतून पळ काढला होता. सोमवारी १३ मे रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि समाजमाध्यमं, टीव्ही चॅनेल्सवरून ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. या दुर्घटनेची माहिती कळताच भावेश भिंडे हा त्याच्या ड्रायव्हरला घेऊन मुंबईतून बाहेर पळाला. मुंबईबाहेर पडल्यानंतर भावेश भिंडे हा लोणावळ्यात गेला आणि तेथील एका खासगी बंगल्यात तो काही थांबला होता. तो लोणावळ्यात लपल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागताच पथकाने तेथेही शोध घेतला मात्र तोपर्यंत भावेश हा तेथून निसटला.

पोलिस मागावर आहेत याची कुणकुण भावेशला लागलीच होती, त्यामुळे त्याने ड्रायव्हरला नवीन सीमकार्ड आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवलं. आणि अवघ्या तासाभरातच भिंडे हा तिथून एकटाच निघून गेला फरार झाला. त्यानंतर त्याने मजल दरमजल करत अहमदाबाद गाठलं आणि तेथे तो काही काळासाठी एका नातेवाईकाकडे थांबला. नंतर तो तिथून राजस्थानच्या उदयपूर येथे गेला. तेथे गेल्यावर भावेश याने त्याच्या भाच्याच्या नावाने एक रूम बूक केली आणि तो तेथेच लपून बसला होता.

एकीकडे भिंडे फरार असताना मुंबई पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. गुन्हे शाखेची 6 ते 7 पथकं राजस्थान, जयपूर, अहमदाबाद आणि लोणावळा परिसरात त्याचा शोध घेत होती. तो उदयपूरमध्ये लपल्याची माहिती मिळाली आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उदयपूरमधील हॉटेलमधून त्याच्या मुसक्या आवळत अटक केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.