बुलेटवर बिअर पिताना रिल बनवण्याची हौस आली, दंड एवढा झाला की खिशात खणखणाट
एका हाताने बुलेटचा हँडल पकडून दुसऱ्या बिअरचा कॅन घेतला. बिअर पित तो रील्स बनवत होता. ही रील्स त्याने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केली. त्यानंतर ती रील्स सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली.
गाझियाबाद : दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर बुलेटवर बसून स्टंटबाजी करत रील्स बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हा तरुण एका हातात मोटारसाटकलचा हँडल पकडून दुसऱ्या हातात बिअरचा कॅन घेऊन बिअर पित होता. तसेच त्याने डोक्यात हेलमेटही घातले नव्हते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच गाझियाबाद वाहतूनक पोलिसांनी कारवाई करत 31 हजारांचा दंड ठोठावला. यामुळे तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे. रील्स बनवण्याची हौस महागात पडली आणि खिशात खणखणाट झाला.
दिल्ली-मेरळ एक्स्प्रेस वे वरील मसुरी भागातील हा व्हिडिओ असल्याचे कळते. या एक्स्प्रेस वे वर दुचाकी चालवण्यास मनाई आहे. तरीही हा तरुण या एक्स्प्रेस वे वर बुलेट घेऊन गेला. त्यात त्याने डोक्यात हेलमेटही घातले नव्हते.
काय आहे व्हिडिओमध्ये?
एका हाताने बुलेटचा हँडल पकडून दुसऱ्या बिअरचा कॅन घेतला. बिअर पित तो रील्स बनवत होता. ही रील्स त्याने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केली. त्यानंतर ती रील्स सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली.
व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अॅक्शन मोडमध्ये
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद वाहतूक पोलीस लगेच अॅक्शन मोडमध्ये आले. व्हिडिओमध्ये कैद झालेल्या दुचाकीचा नंबरवरुन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बुलेटला 31 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बुलेटला 31 हजारांचा दंड ठोठावला
नो एन्ट्रीमध्ये घुसणे, विना हेलमेट गाडी चालवणे आणि बिअर पिऊन वाहन चालवणे अशा तीन गुन्ह्यांसाठी 31 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही बुलेट गाझियाबादमधील असलतपूर जाटव बस्ती येथील रहिवासी अभिषेकच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हे चलन ऑनलाइन कापून घरी पाठवले आहे.
गाझियाबाद आयुक्तालय पोलिसांनी ट्विट केले आहे की, मसुरी पोलिस स्टेशन या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहे. दुचाकीस्वाराला लवकरच अटक करण्यात येईल.