मुलगा बनून फेसबुकवरून मैत्री, नंतर लग्न, सुहागरातच्या दिवशी … तिची करामत ऐकून बसला सर्वांनाच धक्का
ती फेसबूकवरून मुलाच्या नावाने प्रोफाईल चालवत होती. एका मुलीशी चॅटिंगही केले.

हरियाणा : सोशल मीडियाच्या (social media) आभासी जगामुळे (virtual world) अनेकांचं खरं जग उद्धवस्त झालंय. अशीच एक घटना हरियाणातही घडल्याचे समोर आले आहे. बिहारमधील छपरा येथील एका मुलीने फेसबुकवर (facebook) मुलगा असल्याचे भासवून हरियाणातील गुरुग्राम (पट्टाया) येथील एका मुलीला मोहित केले. नंतर दोघेही पळून गेले आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भेटले. एकमेकांवर प्रेम असल्याने नंतर दोघांनी मुंबईला जाऊन मंदिरात लग्न केले. मात्र लग्नानंतर गुरुग्राममधील मुलीला सत्य समजले आणि मोठा धक्का बसला.
आपण ज्याला जीवनसाथी बनवले आहे तो मुलगा नसून मुलगी आहे, हे कळल्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एकमेकांशी लग्न झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. छपरा येथील एकमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तेव्हा ही बाब उघडकीस आली.
छपरा येथील एक मुलगी फेसबुकवर मुलाच्या नावाने प्रोफाईल चालवत असे. येथे तिने गुरुग्राममधील एका मुलीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. जवळपास तीन महिने दोघेही गप्पा मारत होते. ते फेसबुकवरच प्रेमात पडले, त्यानंतर दोघांनी लग्न करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यानंतर छपरा येथील मुलगी २ जून रोजी घर सोडून पळून गेली. गुरुग्राममधील तरुणीनेही तिचे घर सोडले. या दोन्ही मुली कानपूरमध्ये भेटल्या आणि तेथून त्या मुंबईला गेल्या आणि मंदिरात लग्न केले.
लग्नानंतर छपरा येथील तरुणीनेही १५ दिवस मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र हनिमूनच्या दिवशी गुरुग्राममधील मुलीला समजले की तिने ज्याच्याशी लग्न केले आहे तो मुलगा नसून मुलगी आहे. यानंतर दोघेही १४ जून रोजी छपरा येथे पोहोचले.
पोलिसांनी जबाब नोंदवून घेतल्यानंतर दोघांनाही नातेवाईकांच्या ताब्यात दिले
गुरुग्राममधील तरुणीने तिच्या भांगेत नवऱ्याच्या नावाचे कुकू लावले. जिला ती मुलगा समजत होती ती तरूणी तर मुळात बिहारमधील गोपालगंजमधील बैकुंठपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. येथून कुटुंबीयांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले. दोघांनी पोलिसांसमोर आपली बाजू मांडली. चौकशीत गुरुग्राम येथील तरुणीने छपरा येथील तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावल्याचे निष्पन्न झाले. छपराच्या येथील मुलीचे राहणीमान आणि पेहराव मुलासारखा आहे. स्टेशन अध्यक्ष रत्नेश वर्मा यांनी सांगितले की, गुरुग्राममधील मुलीने नवऱ्याच्या नावाने कुंकू लावले होते तर दुसरी ुलगी ही मुलगी पॅंट-शर्ट या पेहरावामध्ये होती. जबाब नोंदवून पोलिसांनी दोघांनाही नातेवाईकांच्या ताब्यात दिले.