Satara Crime | ‘सेमी इंग्लिश मिडियम नको’ म्हणत साताऱ्यात विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय ?

साताऱ्यात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विद्यार्थिनीने सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला कंटाळून चक्का आत्महत्या (Suicide) केलीय. गळफास घेऊन तिने स्वत:ला संपवलंय. आत्महत्या करण्याआधी तिने एक चिठ्ठी लिहलीय. या चिठ्ठीत सेमी इंग्रजीमधून अभ्यास नको म्हणून आत्महत्या करत असल्याचं विद्यार्थिनीने म्हटलंय.

Satara Crime | 'सेमी इंग्लिश मिडियम नको' म्हणत साताऱ्यात विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय ?
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 11:29 AM

सातारा : शिक्षणक्षेत्राचा अफाट असा विस्तार झाला आहे. वाढत्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी (Students) तग धरावी, विद्यार्थ्यांनीही जगातील स्पर्धेशी सामना करावा म्हणून खासगी शिकवणी, महागड्या शाळा यांची रेलचेल सुरु आहे. लाखो रुपयांचे डोनेशन देऊनही अनेकांना काही शाळांमंध्ये प्रवेश मिळत नाही. शाळेतील (School) अभ्यासाचे ओझेही काही विद्यार्थ्यांना झेपेनासे झाले आहे. तशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. साताऱ्यात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विद्यार्थिनीने सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला कंटाळून चक्क आत्महत्या (Suicide) केलीय. गळफास घेऊन तिने स्वत:ला संपवलंय. आत्महत्या करण्याआधी तिने एक चिठ्ठी लिहलीय. या चिठ्ठीत सेमी इंग्रजीमधून अभ्यास नको म्हणून आत्महत्या करत असल्याचं विद्यार्थिनीने म्हटलंय.

पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या 

मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील शाहूपुरी येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.. “सेमी इंग्लिश मीडियम नको” म्हणून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. विद्यार्थिनीने आत्महत्या केलेल्या ठिकाणी शाहूपुरी पोलिसांना एक चिट्ठी आढळून आलीय. त्यामध्ये कोणालाही जबाबदार धरू नये असा उल्लेख करत ‘सेमी इंग्लिश मिडीयम नको’ असल्याने मी आत्महत्या करत असल्याचे विद्यार्थिनीने लिहले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेने सातारा शहर परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर हादरून गेला आहे.

मुंबईत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, 25 जानेवारी रोजी  मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या रामवाडी भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका 21 वर्षांच्या तरुणीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मृत्यूआधी तिनं सुसाईड नोट लिहिली होती. आपला मोबाईलचा पासवर्ड तिनं सुसाईड नोटमध्ये सांगितला असून तिच्या आत्महत्येची नोट वाचून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

इतर बातम्या :

इम्तियाजचे सत्तूरने समिनावर सपासप वार! वाचवायचं दूरच, निर्दयी घटनेचा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला गेला थरार

Mumbai Crime | 17 किलो सोनं 8 कोटी किंमत, मुंबईतून चोरून राजस्थानात पुरलं, पोलिसांनी पर्दाफाश कसा केला ?

‘आयटम चाहीये, तुझे? हांss..’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला चपलेनं हाणलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.