धक्कादायक ! मोबाईलवर रील पाहत होती म्हणून आईने टोकलं; अवघ्या १० वर्षांच्या मुलीने …

लहान मुलगी मोबाईल बघत असताना आई ओरडली आणि मोबाईल खेचून घेतला. यामुळे ती मुलगी संतापली आणि तिने रागाच्या भरात असे कृत्य केले... ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकरली.

धक्कादायक ! मोबाईलवर रील पाहत होती म्हणून आईने टोकलं; अवघ्या १० वर्षांच्या मुलीने ...
डोंबिवलीत रिक्षा चोराला अटक
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 12:30 PM

गाझियाबाद | 26 ऑगस्ट 2023 : आजकाल मोबाईलचे (mobile) व्यसन सर्वांनाच लागले आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण मोबाईल स्क्रीनला चिकटलेलेल दिसतात. मात्र कधकधी मोबाईलचे हे वेड जीवघेणे ठरू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना (crime news) राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये घडली आहे. तेथे मोबाईलपायी अवघ्या १० वर्षांच्या मुलीने तिचे आयुष्यचं संपवलं, या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० वर्षांची ही मुलगी मोबाईलवर रील पाहण्यात बिझी होती. तिची आई तिला जेवण्यासाठी बोलावत होती, पण मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या मुलीने ते काही ऐकले नाही. त्यावरूनच आई तिला ओरडली आणि मोबाईल खेचून घेतला. मात्र यामुळे त्या मुलीला इतका राग आला की थेट आतल्या खोलीत गेली आणि गळफास लावून घेतला. मोबाईलच्या वेडापायी अवघ्या १० वर्षांच्या मुलीने केलेल्या या कृत्यामुळे सर्वच हळहळत आहेत. मुरादनगरच्या हुसैनपूर गावात हा दुर्दैवी प्रकार घडला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलीचे आई-वडील आणि इतर कुटुंबियांचीही चौकशी केली. घटनेच्या दिवशी मुलगी बराच वेळ मोबाईल बघत होती. तिच्या आईने जेवणासाठी तिला अनेकवेळा बोलावले पण तरीही तिने काही हातातला मोबाईल सोडला नाही. अखेर वैतागलेली आई तिला जोरात ओरडली आणि मोबाईल हातातून खेचून घेतला. पण मुलीला हे फार अपमानास्पद वाटले आणि रागही आला. रागाच्या भरातच ती आतल्या खोलीत गेली आणि पंख्याला टांगून गळफास लावून घेतला.

बराच वेळ झाला तरी मुलगी बाहेर आली नाही म्हणून आई खोलीत बघायला गेली असता, समोरील दृष्यं पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने ताबडतोब मुलीला खाली उतरवले आणि रुग्णालयात घेऊन गेली. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची लेक पाचवीत होती. स्वभावाने ती खूप शांत होती. मात्र त्या दिवशी तिला काय झाले ठाऊक नाही आणि तिने रागाच्या भरात हे भयानक कृत्य केले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.