GF BF News : बॉयफ्रेंडला तिने बोलावून घेत उत्तेजना वाढवण्याचं इंजेक्शन दिलं, पण झाला उलटाच गेम!
Girlfriend Boyfriend News : गर्लफ्रेंडने त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बोलावून घेतलं. तिथे त्याला उत्तेजना वाढवण्याचं इंजेक्शनही दिलं मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल.
पटना : सोशल मीडियावरील मैत्री त्यानंतर वाढतं आकर्षण आणि त्यानंतर झालेलं प्रेम हे कितीवेळ टिकेल काही सांगता येत नाही. अनेकवेळा काही दिवसांच्या प्रेमाचा शेवट अगदी वाईट झालेला दिसतो. असच एक प्रकरण समोर आलं असून त्यामध्ये गर्लफ्रेंडने त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बोलावून घेतलं. तिथे त्याला उत्तेजना वाढवण्याचं इंजेक्शनही दिलं मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल.
नेमकं काय आहे प्रकरण?
प्रकाश नावाचा तरूण आणि मंजिता नावाची तरूणी दोघे एका खासगी कंपनीमध्ये कामाला असतात. दोघांची मैत्री असते त्यानंतर काही दिवसात त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं. दोघांमध्ये अगदी जवळचे संबंध निर्माण झालेले असतात, यादरम्यान प्रकाश तिचे खासगी फोटो घेतो आणि तिला ब्लॅकमेल करू लागतो.
मंजिताला या गोष्टीचा भयंकर राग येतो कारण अनेकदा त्याने ब्लॅकमेल केलेलं असतं. एक दिवस ती प्रकाशला डेटवर बोलावते. राणीगंज भेटीचं ठिकाण ठरतं आणि तिथे काही वेळ गप्पा मारतात आणि त्यानंतर ती त्याला उत्तेजना वाढवण्याचा इंजेक्शन देते. मात्र हे इंजेक्शन दिल्यावर उलटाच गेम होतो कारण त्या इंजेक्शनमुळे प्रकाश हे बेशुद्ध होतो. त्यानंतर मंजिता त्याला पेटवून टाकते. प्रकाश बेशुद्ध अवस्थेत पेटल्यामुळे वेदनेने विव्हळतो अखेर त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर ती त्याचा मृतदेह पुरून टाकते.
असा लागला प्रकरणाता छडा
दरम्यान, 16 जूनपासून बेपत्ता झाल्यानंतर, प्रकाशच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रकाशचं शेवटचं बोलणं हे मंजितासोबत झाल्याचं तपासात उघड झालं. बिहारमधील अररिया जिल्ह्यातील आहे. शेवटचे कॉल डिटेल्स बघून मंजिताला ताब्यात घेण्यात आले. मंजिताची चौकशी केल्यावर तिने सर्व काही कबूल केलं.