12 वर्षांचे रिलेशन संपवू इच्छित होती महिला, नाराज लिव्ह इन पार्टनरने भररस्त्यात भोसकले

सिंधु आणि रागेश गेल्या 12 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गेल्या दिवसांपासून दोघांमध्ये पैशांवरुन वाद सुरु होता. यामुळे सिंधु रागेशपासून वेगळी राहत होती.

12 वर्षांचे रिलेशन संपवू इच्छित होती महिला, नाराज लिव्ह इन पार्टनरने भररस्त्यात भोसकले
लिव्ह इन पार्टनरकडून प्रेयसीची हत्याImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 9:36 PM

त्रिवेंद्रम : रिलेशन संपवू इच्छिणाऱ्या महिलेची तिच्या लिव्ह इन पार्टनरने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना केरळमधील त्रिवेंद्रममध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सिंधु असे मयत मुलीचे नाव आहे तर रागेश असे आरोपीचे नाव आहे. त्रिवेंद्रममधील पेरुरकडा परिसरात ही घडना घडली आहे. मयत महिला आणि आरोपी 12 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पैशांवरुन दोघांमध्ये वाद सुरु होते.

मयत महिला आणि आरोपी 12 वर्षांपासून होते रिलेशनमध्ये

सिंधु आणि रागेश गेल्या 12 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गेल्या दिवसांपासून दोघांमध्ये पैशांवरुन वाद सुरु होता. यामुळे सिंधु रागेशपासून वेगळी राहत होती. गुरुवारी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी चर्चा करण्यासाठी दोघे भेटले होते.

आरोपीने महिलेवर चाकूने 10 वार केले

यादरम्यान आरोपीने भररस्त्यात चाकूने सिंधुवर जवळपास 10 वार केले. यात सिंधुचा मृत्यू झाला. आरोपी हत्येचे प्लानिंग करुन सिंधुला भेटायला आला होता. आरोपी सोबत चाकूही घेऊन आला होता.

हे सुद्धा वाचा

घटनास्थळी उपस्थित तरुणांनी आरोपीला पकडले

चाकूहल्ल्यानंतर महिला जखमी अवस्थेत वेदनांनी विव्हळत रस्त्यावर पडली होती. यावेळी तेथून चाललेल्या तरुणाच्या एका ग्रुपने ही घटना पाहिली. या तरुणांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

पोलिसांकडून आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी रागेशला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.