प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला आला अन् भलतच करुन बसला, मग प्रेयसीच्या भावाने थेट…
नागपूरमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संतापलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली.
नागपूर : नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमाचा विकृत चेहरा या घटनेतून समोर आला आहे. विवाहित प्रेयसीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याच्या रागातून प्रेयसीच्या भावाने प्रियकराची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कपिल डोंगरे असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव असून, तो मोबाईल शॉपिच दुकान चालवायचा. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीच्या बहिणीसोबत मयताचे प्रेसंबंध होते
कपिल डोंगरे याचे आरोपीच्या बहणीशी प्रेमसंबंध होते. पण दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. मग दोघांचेही दुसरीकडे लग्न झाले. दोघांचाही संसार सुरळित सुरु होता. मात्र काही दिवसांपूर्वी कपिल प्रेमिकेला भेटायला तिच्या सासरी रायपूरला गेला होता. त्याने प्रेयसीला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याची क्लिप आणि फोटो काढले.
कपिलच्या पत्नीने दोघांचे आक्षेपार्ह फोटो पाहिले अन्…
कपिलच्या पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पतीचे नको त्या अवस्थेतील फोटो मोबाईलमध्ये पाहिले. त्यावरून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. कपिलकडून नंबर घेऊन त्याच्या पत्नीने त्या तरुणीला फोन लावून तिची खरडपट्टी काढली. नातेवाईकांनी कपिलच्या पत्नीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मानायला तयार नव्हती. पतीच्या मोबाईलमधून प्रेयसी सोबतचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढून वस्तीतील ओळखीच्या व्यक्तींच्या एका व्हाट्सअप ग्रुपवर वायरल केल्या. त्यामुळे त्या तरुणीसोबत तिच्या कुटुंबीयांची ही वस्तीत बदनामी झाली.
हत्या करुन स्वतः पोलिसांच्या स्वाधीन
हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीच्या भावाने कपिलला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तरुणाने मंगळवारी दुपारी आधी कपिलच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला चढवला. नंतर त्याला दगडांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.