गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीच्या भावांनी केली मारहाण, ऑटो चालकाने बनवली बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल, मग…
मारहाणीचा बदला घेण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली शक्कल, पण आता जेलमध्ये जाव लागणार,
नवी दिल्ली : एका तरुणाीच्या नावाने सोशल मीडियावर (Social media) अकाऊंट ओपन करुन त्यावर बदनामी आणि अश्लील फोटो शेअर केल्याचं प्रकरण नुकतचं उजेडात आलं आहे. त्यामुळे पोलिस (UP police) सुध्दा चक्रावले होते. या प्रकरणात एका रिक्षा चालकाला (Rickshaw driver)ताब्यात घेतलं असून त्याने हा सगळा प्रकार पोलिसांसमोर कबुल केला आहे. गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीच्या भावाने मारहाण केल्याचा मनात राग असल्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश राज्यातील गाज़ियाबाद शहरातून रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं आहे.
गर्लफ्रेंड आणि मैत्रिण यांच्यात ज्यावेळी भांडण झालं, त्यावेळी मैत्रीच्या भावाने रिक्षा चालकाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्याचा राग तिच्या मनात अधिक होता, त्याचबरोबर रिक्षा चालकाने या सगळ्याचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्याने गर्लफ्रेंडच्या मैत्रीणीच्या नावाने इन्स्टाग्रामवरती एक अकाऊंट सुरु केलं. त्याचवरती काही अश्लील आणि चुकीच्या पोस्ट केल्या. इन्स्टाग्रामवरती अकाऊंट सुरु केल्याचं काही लोकांनी त्या तरुणीच्या लक्षात आणून दिलं. ज्यावेळी तरुणीने त्या पोस्ट पाहिल्या, त्यावेळी तिने थेट पोलिस स्टेशन गाठलं.
झालेला सगळा प्रकार तरुणीने सायबर सेलच्या पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्या अकाऊंटची चौकशी केली. त्यावेळी हे अकाऊंट रिक्षा चालक चालवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या रिक्षा चालकाला उत्तर प्रदेश राज्यातील गाज़ियाबाद शहरातून ताब्यात घेतलं.
त्या तरुणीची तीन अकाऊंट तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर त्या तरुणीचा नंबर सुध्दा शेअर करण्यात आला होता. पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर गर्लफ्रेंडची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे.