मुलाला गोव्यात ठार मारलं, बॅगेत मृतदेह भरून कर्नाटकात गेली; CEO महिलेच्या कृत्याने दोन राज्य हादरली

सुचना सेठचा 2010मध्ये वेंकट रमनशी विवाह झाला होता. नऊ वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. पण एका वर्षानंतर 2020 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या कस्टडीसाठी दोघांनीही कोर्टात धाव घेतली होती. मात्र, त्यापूर्वीच तिने मुलाला संपवलं. तिने मुलाची हत्या का केली ? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे गोव्यासह कर्नाटकातही खळबळ उडाली आहे.

मुलाला गोव्यात ठार मारलं, बॅगेत मृतदेह भरून कर्नाटकात गेली; CEO महिलेच्या कृत्याने दोन राज्य हादरली
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 5:19 PM

पणजी | 9 जानेवारी 2024 : गोव्यात सोमवारी उघडकीस आलेल्या एका खून प्रकरणामुळे खळबळ उडाली. बेंगळुरू येथील एका टेक कंपनीच्या सीईओ महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलाचा सिकेरी, कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये निर्दयपणे खून केला. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने जात असताना तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली. महिलेला पुढील चौकशीसाठी गोव्यात आणले जात आहे. एका उच्चशिक्षित महिलेने केलेल्या या निर्दयी कृत्यामुळे गोवा आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये हादरून गेली आहेत.

सुचना सेठ (वय 39) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला उच्च शिक्षित आणि एका एआय कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे. सुचना सेठने शनिवारी सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षीय मुलासह चेक इन केले. पण सोमवारी तिने हॉटेलमधून एकटीनेच चेकआऊट केले. तिच्या हातात बॅग होती. पण तिचा मुलगा नव्हता. तिने हॉटेलच्या रिसेप्शनला टॅक्सी बुक करण्यास सांगितले. टॅक्सी भाडे महाग पडेल त्यामुळे विमानाने प्रवास करण्याची महिलेला विनंती केली असता तिने टॅक्सीच बुक करण्याचा आग्रह रिसेप्शनकडे धरला. त्यानंतर ही महिला टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने रवाना झाली.

रक्ताचे डाग सापडले

दरम्यान, महिला राहिलेल्या रुममध्ये रक्ताचे डाग सापडल्याने रुमबॉयने तात्काळ हॉटेलमधील वरिष्ठांना कल्पना दिली. पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक चौकशी करून टॅक्सी चालकाला संपर्क केला. पोलिसांनी टॅक्सी चालकाच्या फोनद्वारे महिलेशी संपर्क साधला, महिलेला मुलाबद्दल विचारले असता मुलगा फातोर्डा येथे मित्राकडे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. महिलेची उत्तरं संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चालकाला टॅक्सी जवळच्या पोलीस स्थानकात घेऊन जाण्यास सांगितले.

मुलाच्या ताब्यावरून वाद

टॅक्सी कर्नाटकमधील चित्रदुर्ग पोलीस स्थानकात गेल्यानंतर पोलिसांना महिलेच्या बॅगेत मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता संशयित महिला पतीपासून वेगळी झाली होती. पतीसोबतच्या तणावपूर्ण संबधामुळे ती नाराज होती. तसेच, त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरु असून मुलाच्या कस्टडीसाठी लढाईसाठी सुरू होती, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. याच वादातून मुलाचा खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, केरळ येथील रहिवासी असणारा महिलेचा पती सध्या कामानिमित्त इंडोनेशियात आहे. पतीला घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली असून, त्याला भारतात येण्यास सांगितले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.