BF GF News : घरच्यांविरोधात जात बॉयफ्रेंडसोबत गेली अन् लग्नही केलं, त्यानंतर… धक्कादायक प्रकार

दोघांनी छपरा येथे कोर्ट मॅरेज केलं आणि मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर ते दोघेही दिल्लीला गेले. चार महिन्यांनंतर पती गायब झाला. त्यावेळी प्रेयसीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विच ऑफ लागला.

BF GF News : घरच्यांविरोधात जात बॉयफ्रेंडसोबत गेली अन् लग्नही केलं, त्यानंतर... धक्कादायक प्रकार
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:27 AM

पटना : एका तरूणाने फेसबुकवर तरुणीसोबत मैत्री केली होती. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर तरूणी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध तरूणाकडे निघून गेली. यानंतर या दोघांनी छपरा येथे कोर्ट मॅरेज केलं आणि मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर ते दोघेही दिल्लीला गेले. चार महिन्यांनंतर पती गायब झाला. त्यावेळी प्रेयसीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विच ऑफ लागला. बिहारमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नेमकं काय झालं?

सौनोली गावात राहणारा अंकित कुमार याची भाकुरा भिटाठी गावात राहणाऱ्या प्रीती कुमारी या तरूणीसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर हे दोघं मेसेंजरवर चॅटिंग करत होते. मग दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला. यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर संभाषण सुरू होते. काही काळानंतर त्या दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तरूणीनं सांगितलं की, 27 डिसेंबर 2022 रोजी आम्ही कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर काही दिवसांनी मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार आमचं लग्न झालं  होतं. लग्नानंतर आम्ही दिल्लीला गेलो. त्यावेळी आम्ही अगदी आनंदात राहत होतो. नंतर, काही दिवसांनी अंकित मला न सांगता गावाकडे पळून गेला. गावाकडे आल्यानंतर त्याने माझा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. त्याची वाट पाहून शेवटी मी दिल्लीहून गावाला गेले. तेव्हा अंकितने आणि त्याच्या घरच्यांनी मला घरात येऊ दिले नाही.

दरम्यान, प्रेमात फसवणूक झालेल्या प्रीतीला कोणताही पर्याय उरला नसल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मशरक पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश कुमार यांनी सांगितलं की, तरूणीनं संपूर्ण घटनेची माहिती देत पतीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अर्ज दिला. पोलिसांनी अर्जाच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.