या जिल्ह्यात अश्लील चित्रफिती दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

या जिल्ह्यात अश्लील चित्रफिती दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ
gondiaImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 8:19 AM

शाहिद पठाण, गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस उजेडात येत आहेत. त्याच पद्धतीची आणखी एक घटना पुढे आली आहे. एका शिक्षकाकडून (Teacher) विद्यार्थिनीला अश्लील चित्रफिती दाखवून छळ करणारी घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon)तालुक्यातील एका विद्यालयात घडली आहे. हेमंतकुमार गुलाराम येरणे (35), रा.इसापूर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यातील आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून विशेष सत्र न्यायालयाने त्याला 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वारंवार घटना उघडकीस येत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

‘तू सुंदर आहेस. तू मला आवडते’…

पीडित विद्यार्थिनी ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात नवव्या वर्गात शिकत आहे. या शाळेतील शिक्षक हेमंतकुमार येरणे हा पीडिता व तिच्या मैत्रिणींच्या पाठीवरून हात फिरवायचा. कपडे ओढून आपल्या कक्षात बोलवायचा. एकांतात आपल्याकडील मोबाइलमध्ये अश्लील चित्रफिती दाखवायचा. पीडित विद्यार्थिनीला ‘तू सुंदर आहेस. तू मला आवडते’ असे संवाद साधायचा. पीडितेच्या मैत्रिणींना सुद्धा असेच बोलायचा. लैंगिक छळ करून त्याची लैंगिक इच्छा असल्याचे पीडितेने पोलिस ठाण्यात बयाण दिले. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी अटक केली आहे. शिक्षकाविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

शिक्षकाकडून अशा पद्धतीच्या घटना घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एकप्रकारे भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पालक सुध्दा या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी करीत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.