डंपर शेतात पलटी झाला, परंतु संपूर्ण गावाला या कारणामुळे हादरा बसला
Gondia crime news : गोंदिया जिल्ह्यात काल अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली, लोकांनी ज्यावेळी घटना पाहिली त्यावेळी अनेकांना घाम फुटला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी समजलं की...
शाहिद पठाण, गोंदिया : काल गोंदिया (Gondia) जिल्ह्यात एक घटना घडली आहे. वेगात असलेल्या डंपरने मायलेकाला जोराची धडक दिली. त्यानंतर डंपर शेतात पलटी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी गाडीचा चालक तिथून फरार झाला आहे. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर काही मिनिटामध्ये तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. गोंदिया (Gondia crime news) जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी (morgaon arjuni) तालुक्यातील कोरंभीटोला येथील घटना असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस या प्रकरणी चालकाचा शोध घेत आहेत. सध्या डंपरच्या चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.
धडकेत मायलेकांचा जागीच मृत्यू
मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला येथे काल ज्यावेळी डंपरने माललेकाला धडक दिली. त्यावेळी त्यांचा जागीचं मृत्यू झाला. ही माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथं गेल्यानंतर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केला. मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मृतक मोहन बांगरे हा आपल्या आईला घेऊन नातेवाईकांकडे निघाला होता, त्यावेळी कोरंभीटोला येथे भरधाव डंपरने बाईकला मागच्या बाजूने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, की या धडकेत दोघांचाही जागीचं मृत्यू झाला. मोहन बांगरे वय 24 वर्ष व पुष्पकला बांगरे वय 55 वर्ष असे मृतकांची नावे आहेत.
मृत झालेल्या दोन्ही व्यक्ती भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी चालक तिथून पसार झाला आहे. या घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.