मुंबई / गोविंद ठाकूर : बसस्टॉपवर बसची वाट पाहत असलेल्या महिलेची सोनसाखळी चोरुन पलायन करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. जिनेंद्र नरसिंग राव कोया, ऋषिकेश दळवी उर्फ काल्या बाबू आणि आशिष यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. गोरेगाव पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच चैन स्नॅचिंग प्रकरणात आरोपी जिनेंद्र नरसिंग राव कोया आणि हृषिकेश दळवी उर्फ काल्या बाबू यांना अटक केली होती. जे दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा चैन स्नॅचिंग केले.
पीडित महिला मुलाला शाळेत गेली होती. मुलाला शाळेत सोडल्यानंतर महिला घरी जाण्यासाठी बस पकडण्यासाठी पाटकर कॉलेजजवळील बसस्टॉपवर बसली होती. यावेळी तीन आरोपी आले आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळू लागले. महिला आरडाओरडा करत आरोपींना पकडण्यासाठी मागे धावू लागली. मात्र अॅक्टिव्हा गाडीवर बसून पसार झाले.
यानंतर महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि आसापासच्या परिसरातील 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित अॅक्टिव्हा गाडी दिसली. यात तीन जण गाडीवरुन चालले होते. पोलिसांनी या अॅक्टिव्हाची माहिती काढली. माहितीत अॅक्टिव्हाचा मालक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना कळाले.
यानंतर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. गोरेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चोरट्यांना अटक केली. तिघेही आरोपी चैनस्नॅचर आहेत. तीन चेन स्नॅचर्सकडून दोन तोळे वजनाची सोन्याची चैन आणि चैन स्नॅचिंगमध्ये वापरलेली एक स्कूटी जप्त करण्यात आली आहे. आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंग आणि चोरीचे 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.