Bhandara Rape: घरातल्या लेकीवरच आजोबा आणि दोघा काकांनी केला बलात्कार; पोक्सो अंतर्गत गुन्हा

या प्रकरणातील पीडिता ही 13 वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर 2019 पासून हा अत्याचार होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Bhandara Rape: घरातल्या लेकीवरच आजोबा आणि दोघा काकांनी केला बलात्कार; पोक्सो अंतर्गत गुन्हा
पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 6:20 PM

भंडारा: भंडारा येथे सख्खा आजोबाच (Gramdfather) आपल्या नातीचा (Granddaughter) वैरी निघाला असून नात्याला काळीमा फासत आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दरम्यान त्या अल्पवयीन नातीवर अन्य दोन आरोपींनीही अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सध्या आरोपी आजोबासह अन्य दोघां आरोपीवर लाखनी पोलिसात अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला गेला असून आरोपींना अटक केली आहे.

बलात्कारप्रकरणी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी विलास देवराम तुमसरे (वय 56), यशवंत तातोबा कमाने (वय 67, दोघेही रा. गडेगाव ता. लाखनी) अनिल रमेश सेलोकर (वय 25 रा. रोहणा ता. मोहाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत.

निराधारपणाचा फायदा

या प्रकरणातील पीडिता ही 13 वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर 2019 पासून हा अत्याचार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. पीडिता 11 वर्षाची असल्यापासून तिच्यावर अत्याचार करण्यात येत आहे. 2019 मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असताना शेतामध्ये कोणीच नसल्याची फायदा घेत आरोपी विलास तुमसरेने बालिकेवर शेतातील झोपडीत अत्याचार केला.

अत्याचार करुन धमकी

बालिकेवर अत्याचार केल्यानंतर या घटनेची कुठे वाच्यता केल्यास भावाला आणि आईला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने घाबरुन या घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीची हिम्मत वाढल्याने त्याने चिमुकलीवर आणखी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला.

काकाकडूनही बळजबरी

सख्ख्या आजोबानेही नातीवर हा अत्याचार केलाच पण त्याचवेळी नात्याताल काका असणाऱ्या अनिलनेही तिच्यावर अत्याचार केला आहे. मागील तीन वर्षांपासून वारंवार होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने स्वतः पोलिसात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला.

पोक्सो अंतर्गत गुन्हा

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीवरुन आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र नात्यातील व्यक्तिद्वारे असा किळसवाना प्रकार घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.