धक्कादायक! आजी-आजोबाचं आयुष्य नातवानं का संपवलं ? कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल…

नाशिक ग्रामीण पोलीसांच्या पथकाबरोबर फॉरेंन्सीक टिम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड व तांत्रिक विष्लेशण पथकांनी या हत्येचा उलगडा केला आहे.

धक्कादायक! आजी-आजोबाचं आयुष्य नातवानं का संपवलं ? कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 3:36 PM

नाशिक : आजी-आजोबांच्या म्हातरपणात मित्र असलेल्या नातवाईने केलेले कृत्य खळबळ उडवून देणारे ठरले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेचे कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील कोल्हे दाम्पत्याची कुऱ्हाडीने घाव घालत निर्घृण हत्या केल्याची बाब समोर आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला होता. मात्र, अवघ्या तीनच तासात या हत्येचा उलगडा झाला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मयत कोल्हे आजी-आजोबांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यावरून कळवण पोलीसांनी नातवाला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली जात आहे.

वेरुळे गावात नारायण मोहन कोल्हे आणि त्यांची पत्नी सखुबाई कोल्हे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केल्याची बाब समोर आली होती.

या दुहेरी खुनाचा तपास करत असतांना नाशिक पोलिसांना अवघ्या तीन तासात यश आले असून खुनाचे कारणही समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक ग्रामीण पोलीसांच्या पथकाबरोबर फॉरेंन्सीक टिम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड व तांत्रिक विष्लेशण पथकांनी या हत्येचा उलगडा केला आहे.

तपासात नातूच संशयित आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले होते, त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे खर्च करण्यासाठी पैसे देत नसल्याने ही घटना केल्याची कबुली त्याने दिली आहे.

या घटनेने मात्र नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आजी-आजोबांची हत्या नातवानेच केल्याने हलहळ व्यक्त केली जात आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.