Ambernath Morivali Village : रात्रीपर्यंत देवदर्शनाचा उत्साह, पहाटे गावभर स्मशानशांतता

बसचा पहाटेच्या सुमारास घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. दिवस उजाडताच ही बातमी मोरीवली गावात येऊन धडकली आणि गावात स्मशानशांतता पसरली.

Ambernath Morivali Village :  रात्रीपर्यंत देवदर्शनाचा उत्साह, पहाटे गावभर स्मशानशांतता
बस अपघातानंतर अंबरनाथमधील मोरीवली गावावर शोककळाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 9:49 PM

अंबरनाथ : अंबरनाथमधील कालपर्यंत उत्साहात असणारा मोरीवली गाव आज दुःखात बुडाला आहे. काल रात्री याच गावात शिर्डीला साईदर्शनाला जाण्यासाठी गावकऱ्यांची लगबग सुरु होती. आज तेथे स्मशानशांतता पसरलेली दिसतेय. याचे कारण म्हणजे शिर्डीसाठी निघालेल्या बसला घोटी सिन्नर मार्गावर अपघात झाला. या अपघातात गावातील आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला. काल शिर्डीसाठी निघालेल्या या लोकांचे आज थेट मृतदेहच गावात परतले होते. बस अपघातात एकूण 10 जण मृत्यूमुखी पडले तर 35 जण जखमी झाले. मृत 10 जणांपैकी 8 जण केवळ मोरीवली गावातील रहिवासी होते. तर जखमींपैकी 16 जखमी हे एकट्या मोरीवली गावातले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

दरवर्षीप्रमाणे शिर्डी यात्रा आयोजित केली होती

अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीच्या मालकाकडून दरवर्षी शिर्डी यात्रा आयोजित केली जाते. यासाठी या कंपनीत पॅकिंगचं काम करणाऱ्या महिलांना यावर्षी पासेस वाटण्यात आले होते.

हेच पास घेऊन मोरीवली गावातील जवळपास 35 ते 40 भाविक गुरुवारी रात्री शिर्डीला जाण्यासाठी निघाले. मोरीवली गावातून रात्री साडेनऊच्या सुमारास 15 लक्झरी बसेस रवाना झाल्या. यापैकी 14 बस सकाळी शिर्डीत पोहोचल्या, मात्र एक बस पोहोचलीच नाही.

हे सुद्धा वाचा

घाटी सिन्नर महामार्गावर बसला अपघात

या बसचा पहाटेच्या सुमारास घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील तब्बल 10 जण मृत्युमुखी पडले, तर ३५ जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अंबरनाथच्या मोरीवली गावातील 8 जणांचा समावेश होता.

दिवस उजाडताच गावात बातमी आली अन्…

दिवस उजाडताच ही बातमी मोरीवली गावात येऊन धडकली आणि गावात स्मशानशांतता पसरली. मोरीवली गावातील नरेश उबाळे, वैशाली उबाळे, श्रावणी बारस्कर, श्रद्धा बारस्कर, प्रमिला गोंधळी, दीक्षा गोंधळी, रोशनी वाडेकर आणि बालाजी मोहंती या 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर तब्बल 35 जण जखमी झाले.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

या अपघाताची माहिती मिळताच एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

तर दुसरीकडे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, भाजप शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी मोरीवली गावात धाव घेत मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचं सांत्वन केलं. या एका घटनेमुळे मोरीवली गावातील अनेक घरांचं घरपणच गेलंय.

आजवर इतका मोठा अपघात आणि इतकी दुर्दैवी घटना गावाच्या इतिहासात कधीही घडलेली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र या अपघातानंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडून गेल्याचं पाहायला मिळतंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.