हॉल नातेवाईकांनी गजबजला होता, भटजींनी शुभमंगल सावधानही म्हटले, पण लग्न संपन्न होताच नवरदेव थेट पोलीस ठाण्यात

तरुणाच्या लग्नासाठी हॉलमध्ये सर्व नातेवाईक जमले होते. लग्नाचा मुहूर्त जवळ आला. वर-वधू पाटावर आले. भटजींनी शुभमंगल सावधान म्हणत लग्न लावले. मात्र लग्न विधी आटोपताच नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात पोहचली.

हॉल नातेवाईकांनी गजबजला होता, भटजींनी शुभमंगल सावधानही म्हटले, पण लग्न संपन्न होताच नवरदेव थेट पोलीस ठाण्यात
तरुणीची फसवणूक करणाऱ्या तरुणाला भरमांडवातून पोलिसांनी ताब्यात घेतले
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 9:47 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : डोंबिवलीत एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. एकीशी साखरपुडा करुन दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढली आहे. नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ शिंदे असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. दिलीप शिंदे आणि शांता शिंदे अशी नवरदेवाच्या आई-वडिलांची नावे आहेत. सिद्धार्थ याने पीडित मुलीशी चार वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर चार वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवत होता. मात्र तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरुन तरुणासह त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले.

चार वर्षापूर्वी तररुणीसोबत साखरपुडा केला

सिद्धार्थ आणि त्याच्या पालकांची एका नातेवाईकाच्या साखरपुड्यात पीडित तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली, मग सिद्धार्थच्या पालकांनी तरुणीच्या घरी जाऊन रितसर मागणी घातली. यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने दोघांचा 2017 साखरपुडा पार पडला. साखरपुडा झाल्यानंतर दोघेही एकत्र फिरत होते, एकमेकांना वेळ देत होते. यादरम्यान सिद्धार्थने तरुणीसोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले

तरुणीने विरोध केल्यास तिला आपला साखरपुडा झाला असून, लवकरच लग्न करणार आहोत असे सांगितले. तरुणीच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला फसत गेली. सिद्धार्थने या काळात तरुणीकडून पैसे घेतले. यानंतर तरुणी वारंवार त्याच्याकडे लग्नाची मागणी करु लागली. मात्र सुरुवातीला काही ना काही कारण सांगत टाळाटाळ करत होता. मात्र नंतर त्याने तिला धमकावायला सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांनी तरुणीला सिद्धार्थचे लग्न जुळल्याचे कळले. तिने हळजीच्या दिवशी त्याच्या घरी जाऊन खात्री केली. यानंतर तरुणीने विष्णुनगर पोलीस ठाणे गाठत सिद्धार्थविरोधात तक्रार दाखल केली. ऐन लग्नाच्या दिवशीच पोलीस लग्नमंडपात हजर झाले अन् सिद्धार्थला थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सिद्धार्थसह त्याच्या आई-वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.