प्रत्येक प्रेमी जोडपे ज्या दिवसाची वाट पाहतात तो दिवस अखेर आला, मंडप सजला, वरात आली पण…

लग्नमंडपात सर्वत्र उत्साह होता. वधू आणि वर अशा दोन्ही पक्षाकडचे लोक गाण्यावर ताल धरून बेभान होत नाचत होते. याचदरम्यान नवरोबाच्या वऱ्हाडींनी वधूकडील नातेवाईकांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

प्रत्येक प्रेमी जोडपे ज्या दिवसाची वाट पाहतात तो दिवस अखेर आला, मंडप सजला, वरात आली पण...
अमानुष छळ करणाऱ्या पती आणि सासरच्यांविरोधात महिलेची पोलीस ठाण्यात धावImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 9:52 PM

बाराबंकी : लग्नमंडप म्हटलं की रुसवे फुगवे, चिडणे-चिडवणे आलेच. उत्तर प्रदेशातील एक लग्न मात्र सध्या विशेष चर्चेत आले आहे. मोटारसायकल मिळाली नाही म्हणून नवरदेवाने लग्न मंडपातून पळ काढल्यामुळे हे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मोटारसायकलची मागणी पूर्ण न झाल्याने लग्न न करताच नवरा वरात घेऊन परत गेला.

काय आहे प्रकरण?

नवरोबाने वधूकडून हुंड्याच्या रूपात मोटरसायकल मागितली होती. त्याची ही अपेक्षा वधू पक्षाकडून पूर्ण करण्यात आली नाही. ऐन लग्नात आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच नवरोबाने वधूला लग्न मंडपातच ठेवत पळ काढण्याचा निर्धार केला.

नवरोबा अचानक मंडपातून गायब कसा झाला, याची एकच चर्चा नंतर रंगू लागली. या मागील कारण उघड झाल्यानंतर मात्र सगळे चक्रावून गेले. या घटनेची सध्या उत्तर प्रदेशसह संपूर्ण सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

लग्नातील डान्सवरून वाद झाल्याचे वधू पक्षाचे म्हणणे

लग्नमंडपात सर्वत्र उत्साह होता. वधू आणि वर अशा दोन्ही पक्षाकडचे लोक गाण्यावर ताल धरून बेभान होत नाचत होते. याचदरम्यान नवरोबाच्या वऱ्हाडींनी वधूकडील नातेवाईकांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादाने अचानक उग्र रूप धारण केले. यावेळी नवरोबाने मुलीच्या आई वडिलांकडे हुंडा म्हणून मोटारसायकल मागितली. त्याची ही मागणी पूर्ण करण्यास वधूचे नातेवाईक तयार झाले नाहीत. त्यामुळे नवरोबा खवळला. त्याने भर लग्न मंडपातच वधूला धडा शिकवण्याचे ठरवले आणि मंडपातून पळ काढला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.