भुवनेश्वर : जीआरपी अर्थात रेल्वे पोलिसांनी तब्बल 16 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (gold ornaments) जप्त केले आहेत. मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसने (Mumbai-Bhubaneswar Konark Express) प्रवास करणाऱ्या चौघा प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या चौघांकडून हस्तगत करण्यात आलेल्या सोन्याचे वजन तब्बल 32 किलो इतके आहे. बुधवारी ओदिशाची राजधानी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील हसमुख लाल जैन, सुरेश सहदेव खरे, महेश भोसले आणि दीपक पटेल या चार प्रवाशांनी ट्रेनमधून उतरल्यानंतर भुवनेश्वर स्थानकावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांना त्यांच्या हालचालींवर संशय आला.
पोलिसांनी चौघा प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली असता, चार बॅगांमध्ये प्रत्येकी 8 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लपवून ठेवल्याचे आढळले. हे पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे
संशयित आरोपी कर चुकवण्यासाठी रेल्वेतून सोन्याची अवैध वाहतूक करत होते. त्यांना हे सोने भुवनेश्वर आणि परिसरातील व्यापाऱ्यांना विकायचे होते. करचोरी, हवाला आणि मनी-लाँड्रिंगच्या दिशेने चौकशी करण्यासाठी आम्ही प्राप्तिकर विभाग आणि केंद्रीय जीएसटी शाखेसह सीमाशुल्क आणि आयकर अधिकार्यांना ताबडतोब कळवले, अशी माहिती एडीजी (रेल्वे आणि किनारी सुरक्षा) सुधांशू सारंगी यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, प्रवाशांकडे दागिन्यांच्या कर पावत्यांसह कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. मुंबईत राहणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या मूळ मालकाला चौकशीसाठी भुवनेश्वरमधील आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
Bhubaneswar | Government Railway Police (GRP) seized over 32 kg of gold jewellery worth over Rs 16 crores from Mumbai-Bhubaneswar Konark Express yesterday
Four persons were detained in this connection for interrogation after they failed to produce valid GST documents, said GRP. pic.twitter.com/orRiJ0WFNS
— ANI (@ANI) March 3, 2022
संबंधित बातम्या :
पुढच्या दोन वर्षांत लग्न करताय? रशिया-युक्रेन युद्धाचा तुम्हालाही फटका बसणार…
सोन्याच्या पन्नास हजारी घौडदोडीला ब्रेक; खरेदीदारांसाठी संधी, जाणून घ्या आजचे भाव