आधी फायरिंग केलं, पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, वाँटेड आरोपीला पळवलं

देशाच्या राजधानीमध्ये कायदा सुव्यस्था राखणाऱ्या दिल्ली पोलिसांना गुंडांनी आव्हान दिलं आहे. Delhi Police

आधी फायरिंग केलं, पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, वाँटेड आरोपीला पळवलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 3:06 PM

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीमध्ये कायदा सुव्यस्था राखणाऱ्या दिल्ली पोलिसांना गुंडांनी आव्हान दिलं आहे. दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमध्ये गुंडांनी गोळीबार आणि पोलिसांवर मिरची पावडर फेकून कुख्यात आरोपी कुलदीप फज्जाला पळवून नेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दिल्ली पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, आरोपींबाबत माहिती मिळालेली नाही. (GTB Hospital Delhi Police was attacked by goons and one most wanted accused run away from police custody)

जीटीबी रुग्णालयात घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ज्या कुलदीप फज्जाला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेले तो मोस्ट वाँटेड आरोपी होता. दिल्ली पोलिसांची टीम त्याला तुरुगांतून आरोग्य तपासणीसाठी जीटीबी रुग्णालयात घेऊन आली होती. पोलीस कुलदीप फज्जाला घेऊन पोहोचताच स्कॉर्पिओ आणि दुचाकीवरुन काही लोक आले. गुंडांनी 12.30 वाजता रुग्णालयात प्रवेश केला आणि पोलिसांच्या पथकाच्या प्रमुखावर मिरची पावडर फेकली. यावेळी निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी कुलदीपला घेऊन पसार झाले.

पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

पोलिसांनी यावेळी प्रत्युत्तर देताना गोळीबार केला. यामध्ये एका आरोपीचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. कुलदीप फज्जा जितेंद्र गोगी गँगचा सदस्य असून त्याच्यावर 70 हून अधिक लोकांच्या हत्येप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

कुलदीप फज्जा दिल्ली हरियाणामध्ये वाँटेड

पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला कुलदीप हा दिल्ली आणि हरियाणा पोलिसांसाठी वाँटेड आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर 2 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. 2020 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी सर्व विभागांना या घटेनची माहिती दिली असून तपास करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:  काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावणारा शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री, कोण आहेत संजय राठोड?

Shocking Video! लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

(GTB Hospital Delhi Police was attacked by goons and one most wanted accused run away from police custody)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.