गुजरातहून स्पोर्ट्स बाईकने येऊन मुंबईतील व्यापाऱ्यांची लूट, दिंडोशीत दोघांना बेड्या
मालाडच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केलेले दोघे सराईत गुन्हेगार हे गुजरातचे रहिवासी आहेत. (Gujarat Men looted Mumbai Traders )
मुंबई : गुजरातहून स्पोर्ट्स बाईकने येऊन मुंबईतील व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्यांना दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोघा लुटारुंकडून तब्बल 13 लाख रुपयांची रोकड आणि एक स्पोर्ट्स बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. व्यापाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्या हातातील रोकड लुटण्याची त्यांची मोडस ऑपरेंडी होती. (Gujarat Men looted Mumbai Traders by visiting on Sports Bike)
मालाडच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केलेले दोघे सराईत गुन्हेगार हे गुजरात येथील छारा नगर आणि कुबेर नगर या भागातले रहिवासी आहेत. दोघे स्पोर्ट्स बाईकने मुंबईला येऊन अंगाडिया या व्यापाऱ्यांवर नजर ठेवत होते. संधी मिळताच त्यांच्या हातातील रक्कम घेऊन ते पसार होत होते. सध्या या टोळीतील दोघा जणांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांचा पोलीस तपास करत आहेत.
स्कूटरची चावी घेऊन 21 लाख लंपास
या प्रकरणाची पूर्ण माहिती दिंडोशी पोलिसांना तेव्हा मिळाली, जेव्हा विशाल गाडा नावाच्या व्यक्तीने 10 मार्च रोजी दिंडोशी पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. विशाल संध्याकाळी सात वाजता आपल्या स्कूटरवर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मालाड पूर्व भागातील टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ पोहोचला. तेव्हा एका बाईकस्वाराने त्याला बघितले. संधी मिळताच त्याने विशालच्या स्कूटरची चावी घेतली आणि त्याचे तब्बल 21 लाख रुपये घेऊन तो पसार झाला.
दोघा चोरट्यांना गुजरातमध्ये बेड्या
या तपासात दिंडोशी पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर त्यांना या टोळीची माहिती मिळाली. त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना असे कळले की हे आरोपी गुजरातमधील छारा नगर येथील राहणारे आहेत. पोलिसांनी छारा नगर विभागात जाऊन 42 वर्षीय विशाल विक्रम तमंचे आणि 25 वर्षीय अमित नरेश तमंचे यांना अटक केली आहे.
राजस्थानात ‘स्पेशल 26 स्टाईल लूट’
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात हिंदी चित्रपट ‘स्पेशल 26 स्टाईल लूट’ सारखं एका कुटुंबाला लुबाडलं गेल्याची घटना समोर आली आहे. जयपूरच्या एका व्यवसायिकाच्या घरात तीन इसमांनी अँटी करप्शन ब्यूरोचे अधिकारी सांगत छापा टाकला. त्यांनी संपूर्ण घर पिंजून काढलं. त्यांना घरात 23 लाख रुपये रोख रक्कम मिळाली. ते कारवाईच्या नावाने सर्व पैसे कार्यालयात घेऊन जातो सांगत फरार झाले. आरोपींनी दोन हार्डडिस्कही चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
संबंधित बातम्या :
स्पेशल 26 स्टाईल लूट, खोट्या करप्शन अधिकाऱ्यांचा छापा, तब्बल 23 लाख घेऊन फरार
(Gujarat Men looted Mumbai Traders by visiting on Sports Bike)