पकडले जाण्याच्या भीतीने तस्कर फरार, गुजरातमध्ये कोट्यवधींचे ड्रग्स जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

जरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ (drugs) जप्त केले. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे ही कारवाई करण्यात आली. सुमारे ८०० कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. गुजरात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

पकडले जाण्याच्या भीतीने तस्कर फरार,  गुजरातमध्ये कोट्यवधींचे ड्रग्स जप्त, पोलिसांची मोठी कारवाई
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 1:50 PM

अहमदाबाद | 29 सप्टेंबर 2023 : गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ (drugs) जप्त केले आहे. समुद्रकिनाऱ्याजवळून त्यांनी सुारे 80 किलो ड्रग्स ताब्यात घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत सुमारे 800 कोटी (800 crore rupees) रुपये असल्याचे समजते. खबऱ्यांकडून यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत तपास सुरू केला. पोलिसांची धाड पडताच ड्रग्स तस्कर अमली पदार्थांची पॅकेट्स तिथेच टाकून फरार झाले.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे ही कारवाई करण्यात आली. समुद्र किनाऱ्याजवळील परिसरात 80 किलोपेक्षा जास्त वजनाचा अंमली पदार्थांचा हा माल बेवारस अवस्थेत पडलेला आढळला. एफएसएलच्या प्राथमिक तपासात हे कोकेन असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

पकडले जाण्याच्या भीतीने ड्रग्स तस्कर फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीधाम शहराजवळील खाडी किनारी सुमारे 80 पॅकेट्समध्ये कोकेन सापडले. या प्रत्येक पॅकेटचे वजन साधारण एक किलो तरी आहे. पोलिस या ठिकाणावर सतत लक्ष ठेवून होते. छापा पडणार असल्याची माहिती मिळाल्यावर पकडले जाण्याच्या भीतीने ड्रग्स तस्करांनी सर्व माल तिथेच टाकला आणि ते फरार झाले असे कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले.

ड्रग्जच्या डिलिव्हरीबाबत खबऱ्यांतर्फे आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही पथक तैनात करून शोधमोहीम तीव्र केली. यावेळी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये आम्ही समुद्र किनाऱ्यावरून कोकेनची 80 पाकिटे जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले.

मात्र गुरुवारी गांधीधामजवळ जप्त करण्यात आलेल्या पॅकेट्सचा पूर्वी सापडलेल्या ड्रग्स्च्या पॅकेटशी काहीही संबंध नसल्याते बागमार यांनी स्पष्ट केले. ही पॅकेट्स अलीकडेच जप्त करण्यात आली असावीत. आम्ही माहितीनंतर ज्यांचा मागोवा घेत होते, त्याच मालाचा ही पाकिटे भाग असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वीही जप्त केला होता मोठा साठा

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इतर एजन्सींनी गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानजवळील जाखाऊजवळच्या किनाऱ्यावरून अनेक वेळा हेरॉईन आणि कोकेनने भरलेली पॅकेट जप्त केली होती. तेथे तपास केल्यावर पकडले जाऊ नये म्हणून तस्करांनी ड्रग्जची अनेक पाकिटे समुद्रात फेकून दिली. मात्र नंतर ती किनाऱ्यावर वाहून आल्याचे आढळले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.