Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंवर आणखी एक गुन्हा दाखल, बीडमधील प्रकरण काय?

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण बीडमध्ये सदावर्ते यांच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंवर आणखी एक गुन्हा दाखल, बीडमधील प्रकरण काय?
गुणरत्न सदावर्तेंची पैसे घेतल्याची कबुली, सरकारी वकिलांचा दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 5:48 PM

बीड : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण बीडमध्ये सदावर्ते यांच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सदावर्तेंवर दाखल होणारा हा तिसरा गुन्हा आहे. सुरूवातीला शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. या आंदोलकांना भडकावल्याचा आणि सतत प्रक्षोभक भाषणं केल्याचा, कट रचल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई पोलिसांकडून ठेवण्यात आला. या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्तेंना चार दिवस पोलीस कोठडीत मुक्कामी काढावे लागले, त्यानंतर त्यांचा ताबा हा सातारा पोलिसांना देण्यात आला.

बीड पोलीसह ताबा घेणार?

साताऱ्यातही सदावर्तेंची चार दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र हे प्रकरण फक्त साताऱ्यापर्यंतच थांबले नाही. तर कोल्हापुरात आणि पुण्यातही गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. साताऱ्यानंतर आता बीड पोलीसही सदावर्तेंना ताब्यात घेण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे बीडमधल्या गुन्ह्यात सदावर्तेंच्या अडचणी किती वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आणखी किती दिवस कोठडी मुक्कामी?

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आणि संपचा मुद्दा गाजत आहे. या आंदोलकांचे नेतृत्व गुणरत्न सदावर्ते करत होते. तसेच कोर्टात या कर्मचाऱ्यांची बाजुही गुणरत्न सदावर्ते हेच मांडत होते. या आंदोलनावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा शरद पवार यांच्यावर टीकाही केली. आणि त्यामुळेच आंदोलन भडकले असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच गुणरत्न सदावर्ते हे भाजपने पोसलेला गुंड असल्याची टीकाही होऊ लागली. मात्र मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर आता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल होऊ लागल्याने सदावर्तेंना बरेच दिवस कोठडी मुक्कामी काढावे लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकार हे सर्व सुडाच्या भावनेतून करत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा मुद्दा आता आणखी तापण्याची शक्यता आहे.

Nanar Refinery Project : राज्याने लोकांच्या रोजगाराचा विचार करावा, श्रीपाद नाईक यांची रिफायनरीबाबत भूमिका

Raj Thackeray : ‘बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही’, चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंना टोला; तर औरंगाबादेत राज यांच्या सभेची जय्यत तयारी

Ayodhya Hindutva Politics : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा धसका? आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला जाण्याच्या तयारीत

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.