पोलीसांच्या नाकावर टिच्चून की पोलिसांचाच आश्रय, अवैध गुटख्याच्या कारवाईने नाशकात उलटसुलट चर्चा

महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे. त्यामुळे गुटखा विक्री सर्रास होत असल्याने हा गुटखा कुठून येतो ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असतो

पोलीसांच्या नाकावर टिच्चून की पोलिसांचाच आश्रय, अवैध गुटख्याच्या कारवाईने नाशकात उलटसुलट चर्चा
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 2:10 PM

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत असलेल्या अंबड पोलीस ठाणे ( Ambad Police ) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्हे पाठीमागेच मोठा गुटख्याचा ( Gutkha ) साठा सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात चर्चा होऊ लागली असून अंबड पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यवसायिकाकडे हा गुटखा सापडला त्याच व्यवसायिकावर यापूर्वी अनेकदा कारवाई ( Crime News ) झाली आहे. त्यामुळे अंबड पोलिसांचा कारभार चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतीच करण्यात आलेली कारवाईत तब्बल साडेतीन लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे. त्यामुळे गुटखा विक्री सर्रास होत असल्याने हा गुटखा कुठून येतो ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असतो. त्याच दरम्यान गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न पडत असतो.

शहरातील कुठलाही पान ठेल्यावर गुटखा उपलब्ध असतो. इतकंच काय खेड्यापाड्यातही सर्रासपने किराणा दुकानात सुद्धा गुटखा विक्री होत असतो. त्यामुळे गुटखा बंदी असतांनाही शहरात महाराष्ट्रात गुटखा येत असतो.

हे सुद्धा वाचा

गुटखा रॅकेट चालवणाऱ्यांवर पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होत असतांना दुसऱ्या बाजूला अंबड पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूलाच गुटख्याचे गोडाऊन असल्याचे समोर आले आहे.

अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पोलीसांनी छापा टाकला त्यामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांचा गुटखा आढळून आला आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या मागील बाजूलाच मुसळे ट्रेडर्स आहेत. त्यांच्या गोडाऊनमध्ये तब्बल दहा पोटे मुद्देमाल मिळून आला आहे. यामध्ये विमल पानमसाला, रजनीगंधा, जर्दा असे विविध प्रकारचा गुटखा आढळून आला आहे.

जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत करत व्यवसायिक सुनील रघुनाथ मुसळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान या गोडाऊनचा तपास पोलिसांना लागला असल्याची माहिती आहे.

व्यवसायिक सुनील रघुनाथ मुसळे याच्याकडे यापूर्वी अनेक वेळा गुटखा आढळून आला आहे. कारवाई होऊनही पुन्हा पुन्हा सुनील रघुनाथ मुसळे हा गुटखा विक्री सुरूच ठेवतो. त्यामुळे ही कारवाई अधिकच चर्चेत आली आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरूनच मुसळे गुटखा विक्रीचा होलसेल व्यवसाय करत असल्याची चर्चा अंबडसह संपूर्ण शहरात होऊ लागली आहे.

शहरात असे अनेक सुनील मुसळे आहेत, त्यांच्यावर शहर पोलीस कारवाई करतील का ? हा खरा सवाल आहे. अन्यथा एका कारवाईनंतर प्रशासन समाधान मानून पुन्हा परिस्थिती जैसे थे होता कामा नये अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.