नांदेडच्या बँकेत हॅकरचा दरोडा, 14 कोटी लुटले, तुमचे अकाऊंट चेक केलात?
शंकर नागरी सहकारी बँकेतील खात्यामधून हॅकरने साडे चौदा कोटी दुसऱ्या खात्यात वळवले आहेत.( Shankar Nagari Sahkari Bank)
नांदेड: बँक खाते हॅक करून साडे चौदा कोटी रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बँकेतील खात्यामधून हॅकरने साडे चौदा कोटी दुसऱ्या खात्यात वळवले आहेत. शंकर नागरी बँकेने या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ( Hacker theft 14 crore rupees from Shankar Nagari Sahkari Bank,Nanded )
नांदेडमधील शंकर नागरी सहकारी बँकेतून 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये रुपये संशयास्पद रित्या वळवण्यात आले आहेत. ही घटना 2 जानेवारी रोजी बँक व्यवस्थापनाला समजली. शंकर नागरी बँकेची शाखा नांदेड शहरातील आयडीबीआय बँकेजवळ आहे. बँक व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार करुन या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
लाहोटी कॉम्प्लेक्समधील आयडीबीआय बँकेजवल असलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेचे पैसे हॅकर लुटले आहेत. NEFT आणि RTGSद्वारे बँकेला चुना लावण्यात आला. पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सायबर सेलकडून याघटनेची चौकशी करण्यात येत आहे. सध्या बँक अधिकाऱ्यांनी माध्यमांना याबाबत माहिती देण्यास इन्कार केला आहे.
आरबीआयकडून दोन बँकांवर निर्बंध
KYC च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दोन सहकारी बँकेना दंड ठोठावलाय. रायपूर येथील व्यावसायिक सहकारी बँकेकडून पाच लाखांचा दंड आकारलाय, तर लातूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेला दोन लाखांचा दंड ठोठावलाय. KYC ची कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने हा दंड आकारण्यात आल्याचे महाराष्ट्र नागरी बँक प्रशासनाने सांगितले. या दंडाचा ग्राहकांच्या सेवेवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय.
आरबीआयने ऑन-साइट एटीएम उघडण्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने रायपूर येथील व्यावसायिक सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आलीय, तर केवायसी आणि इतर निकषांचे उल्लंघन पालन केलं नसल्यानं लातूरच्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेकडून दंड आकारलाय. 31 मार्च 2018 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती तपासणी अहवालात अचूक नाही. तसेच एटीएम आणि केवायसी सुरू करण्याच्या दिशानिर्देशांचेही बँकेकडून पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या बँकांना एकूण 7 लाख रुपयांचा दंड या बँकांकडून आकारण्यात आलाय. तर हा दंड कोणत्याही ग्राहकांच्या व्यवहार किंवा करार वैधतेसाठी ही कारवाई करण्यात आलेली नाहीय.
केडीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, भाजप नगरसेवक बिल्डर मनोज रायला अटकhttps://t.co/6trRLKTkH2 #kdmc #BJP #kalyanpolice #kdmcelection
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2021
सबंधित बातम्या:
महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?
RBI ची मोठी कारवाई, लातूरमधील दोन सहकारी बँकांना दंड ( Hacker theft 14 crore rupees from Shankar Nagari Sahkari Bank,Nanded )