मोठी बातमी! संशयास्पद बोटीत AK47 च्या तीन रायफल, हरिहरेश्वर किनाऱ्यावर खळबळ, पाहा EXCLUSIVE फोटो, हालअलर्ट जारी
Maharashtra Boat News : संशयास्पद बोटीमध्ये AK 47 बंदुका आढळून आल्या आहेत. एकूण तीन बंदुकांनी भरलेलील बॅक समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रायगड : रायगडमधून (Raigad News) खळबळजनक बातमी समोर येतेय. हरिहरेश्वर (Harihareshwar suspicious boat) येते आढळलेल्या संशयास्पद बोटीमध्ये AK 47 बंदुका आढळून आल्या आहेत. एकूण तीन बंदुकांनी भरलेलील बॅक समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रायगड (Raigad High Alert) जिल्ह्यात हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सकाळी आढळून आली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या संशयास्पद बोटीत एके 47 रायफली आणि काही काडतूसं सापडली आहेत. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद स्थितीत समुद्रात होती. त्यानंतर ती बोट समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आली आहे. या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने, आता यामागे काही घातपाताचा कट होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. मच्छिमारांना ही बोट पहिल्यांदा दिसली होती. ही एक स्पीड बोट असून या स्पीड बोटीत कोणताही माणूस नव्हता. त्यामुळे मच्छिमारांनी याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. त्यानंतर ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. ही बोट भरकटून किनाऱ्याजवळ आल्याची माहिती आहे. या बोटीत सापडलेली शस्त्रास्त्रे ही खरी आहेत की डमी आहेत, याचा तपास करण्यात येतो आहे.
पाहा EXCLUSIVE फोटो :
शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ, घातपाताचा संशय
मोठ्या प्रमाणात हा शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तीन एके ४७ रायफली आणि मोठ्य़ा प्रमाणात काडतुसं या बोचीत साप़डली आहेत. या बोटीत असलेल्या बॉक्समध्ये तीन रायफली आणि काडतुसं सापडली आहेत. एखाद्या मोठ्या हल्ल्याचा हा कट होता का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एटीएस प्रमुख विनित अग्रवाल हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
पाहा व्हिडीओ :
विधानसभेतही मुद्दा उपस्थित
हा मुद्दा विधानसभेत अदिती तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्या ठिकाणी बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीही एक बोट साप़डली असून त्यात एक कागदपत्रं आहेत, अशीही माहिती असल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्पेशल पथक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी अदिती तटकरे यांनी केली आहे. याबाबत राज्य सरकार आणि गृहमंत्री यांनी सभागृहात याबाबत निवेदन करावे अशीही मागणी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक पोलीस यंत्रणेसोबत एटीएस आणि केंद्रीय यंत्रणांनी याचा तपास करावा अशी मागणीही अदिती तटकरे यांनी केली आहे.