Crime : कलियुगामध्ये कोण काय करेल याचा काही नेम नाही. प्रेम प्रकरणांमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विवाहित महिला आणि पुरूषांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये 12 वर्षांचा सुखाचा संसार मोडत विवाहित महिलेने जे नको ते पाऊल उचललं आणि संपूर्ण घर बसलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
सतीश आणि ज्योती यांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, दोघांना दोन मुले आहेत. कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी होते. दोघांनी घर बांधण्याचं काम सुरू केलं होतं. मात्र कोणीच कल्पनाही केली नव्हती घर पूर्ण होण्याच्या आतच दोघाचं घर बसलं.
घर बांधायला काढल्यावर रोहतास नावाचा एक मजूर तिथे काम करत होता. रोहतासचे मजूरीचे काम करता करता सतीशची पत्नी ज्योतीसोबत प्रेम प्रकरण सुरू झालं. दोघांचं प्रेम प्रकरण रंगात आलं होतं पण दोघांच्या अवैध संबंधांबाबत समजताच त्याने विरोध करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम झालं होतं की त्यांनी नको तो करण्याचा निर्णय घेतला.
रोहतास यांनी सतीशला मार्गातून हटवण्याची योजना तयार केली. 5 मे रोजी रात्री रोहतासने सतीशला दारू पाजली. त्यानंतर त्याला त्याच्याच ई-रिक्षात बसवून गुजराणी रोडवर नेले. जिथे त्याने सतीशचा पायजमाच्या नाडीने गळा आवळून खून केला.
दरम्यान, या प्रकरणी एएसपी लोगेश कुमार यांनी सांगितले की, सीआयए-1 आणि सायबर पोलिस स्टेशनने तपास करताना दोन्ही आरोपींना 72 तासांत अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची कोठडी मिळाली. पोलिसांनी सांगितले की, मृत सतीश हा दोन मुलांचा बाप असून प्रियकर रोहतास अविवाहित आहे. हरियाणातील भिवानी येथील ही घटना आहे.