महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य

हेड कॉन्स्टेबल सरोज गेल्या काही दिवसांपासून फरिदाबाद शहरातील सेक्टर-31 येथील पोलिस लाईन्समध्ये राहत होत्या. पती आणि मुलगा अशा कुटुंबासह त्या घरात राहत होत्या. एनआयटी पोलिस ठाण्यात त्या हेड कॉन्स्टेबल पदावर तैनात होत्या.

महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य
हरियाणातील दाम्पत्य राहत्या घरी मृतावस्थेत
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 11:23 AM

चंदिगढ : महिला हेड कॉन्स्टेबल (Lady Head Constable) आणि तिच्या पतीचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातील फरिदाबादमध्ये (Faridabad Haryana) हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सेक्टर-31 येथील पोलीस लाईनमधील घरी हे दाम्पत्य मृतावस्थेत (Couple found dead) आढळले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून तपास सुरु केला आहे. ही घटना घडली त्यावेळी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा घरी नव्हता. परीक्षेसाठी तो शाळेत गेला होता, मात्र घरी येऊन पाहिल्यानंतर त्याला आई-वडील मृतावस्थेत दिसल्याने त्याला मोठा धक्का बसला.

काय आहे प्रकरण?

हेड कॉन्स्टेबल सरोज गेल्या काही दिवसांपासून फरिदाबाद शहरातील सेक्टर-31 येथील पोलिस लाईन्समध्ये राहत होत्या. पती आणि मुलगा अशा कुटुंबासह त्या घरात राहत होत्या. एनआयटी पोलिस ठाण्यात त्या हेड कॉन्स्टेबल पदावर तैनात होत्या.

महिलेची हत्या, पती फासावर

बलवंत सिंग (SHO सेक्टर-31) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस लाईनमध्ये राहणारी महिला हेड कॉन्स्टेबल सरोज यांची हत्या झाली आहे. तर त्यांच्या पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हत्येमागची कारणे समोर येतील, असं पोलिसांनी सांगितलं.

महिला हेड कॉन्स्टेबलच्या नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. ते ज्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सरोज यांना 11 वर्षांचा मुलगा आहे. सरोज यांचा खून झाला त्या दिवशी तो परीक्षा देण्यासाठी गेला होता. मात्र घरी परत आल्यावर त्याने आपले आई-वडील या जगात नसल्याचं समजलं.

संबंधित बातम्या :

एक दुजे के लिये! दोघांचीही लग्नं झाली, पण मन रमेना, अमरावतीत ‘विवाहित’ प्रेमी युगलाची आत्महत्या

माय लास्ट लोकेशन इज…, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, पुलावर सायकल, भंडाऱ्यात ITI च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल?

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.