Triple Murder | आधी सीएनजी स्टेशनचे लाईट बंद केले, मग मॅनेजरसह तिघांचा खून

आम्हाला पहाटे तीन वाजता सीएनजी पंपावर एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आजूबाजूला शोध घेतला, तर एकूण तीन मृतदेह सापडले, असं पोलिसांनी सांगितलं

Triple Murder | आधी सीएनजी स्टेशनचे लाईट बंद केले, मग मॅनेजरसह तिघांचा खून
Image Credit source: टीव्ही9
| Updated on: Feb 28, 2022 | 12:40 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील सीएनजी स्टेशनवर (Gurugram CNG Station) तीन तरुणांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री 3 वाजता घडली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेक्टर 31 येथील सीएनजी पंपावर अज्ञात चोरट्यांनी तिघा तरुणांची चाकूने भोसकून हत्या (Triple Murder) केली. हत्येनंतर हल्लेखोर पळून गेले. पुष्पेंद्र, भूपिंदर आणि नरेश अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिघेही तरुण उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) रहिवासी होते.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला पहाटे तीन वाजता सीएनजी पंपावर एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आजूबाजूला शोध घेतला, तर एकूण तीन मृतदेह सापडले. तिन्ही तरुणांची तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. प्रत्येकाच्या शरीरावर डझनभर वार करण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी आधी सीएनजी पंपाची लाईट बंद केली आणि नंतर तीन तरुणांची हत्या करून पळ काढला. तीन तरुणांपैकी एक तरूण पंपावर काम करणारा व्यवस्थापक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या तिन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

तिहेरी हत्याकांडानंतर पुन्हा एकदा गुरुग्राम पोलिसांच्या कामगिरीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच येथील एका दारु व्यावसायिकाची हत्या झाली होती. दारू व्यावसायिकाच्या हत्येला मोठा काळ लोटला असून पोलिसांना या प्रकरणाचा सुगावा लागलेला नाही.

संबंधित बातम्या :

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले, पतीचं टोकाचं पाऊल

हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या, चार वर्षांपासून रुम बुक करणारा मित्र संशयाच्या भोवऱ्यात

प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल