नवरोबा गुपचूप दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला, सप्तपदींआधी पहिल्या बायकोची एण्ट्री, मग काय.. राडाच!

पीडितेचे म्हणणे आहे की, दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 12 मार्च 2020 रोजी तिचे फतेहपूर बिल्लौच येथील रहिवासी रोहितसोबत लग्न झाले होते. ती फक्त एक महिना पतीसोबत राहिली.

नवरोबा गुपचूप दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला, सप्तपदींआधी पहिल्या बायकोची एण्ट्री, मग काय.. राडाच!
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 3:46 PM

चंदिगढ : हरियाणातील पलवलमध्ये (Haryana Crime News) एका लग्न समारंभात मोठा गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून लग्न सोहळा (Wedding Ceremony) थांबवले. नवरदेव गुपचूप दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार पहिल्या पत्नीला कळताच तिने कुटुंबीयांसह लग्नस्थळ गाठलं. त्यानंतर तिने चांगलाच गदारोळ (Ruckus) घातला. त्यानंतर वराने वऱ्हाडी मंडळींसह पळ काढला. तर त्याच्या दुसऱ्या वधूने नवऱ्याच्या पहिल्या लग्नाविषयी कुठलीच माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

पीडितेचे म्हणणे आहे की, दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 12 मार्च 2020 रोजी तिचे फतेहपूर बिल्लौच येथील रहिवासी रोहितसोबत लग्न झाले होते. ती फक्त एक महिना पतीसोबत राहिली. पीडितेने पोलिसांना सांगितले की, सासरच्या लोकांना ती आवडत नव्हती. त्यानंतर तिचा नवरा तिला भुलवून माहेरी घेऊन आला, मात्र पुन्हा तिला घेण्यासाठी परत आलाच नाही.

पहिल्या बायकोने लग्नस्थळ गाठले

आपला नवरा पलवलमध्ये असून त्याचे पुन्हा लग्न होत असल्याचे तिला समजल्यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांसह लग्नस्थळ गाठले आणि 112 करामांकावर पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आणि लग्न थांबवले. पीडितेने पोलिसांना सांगितले की, त्यांचे आधी आर्य समाज मंदिरात लग्न झाले होते आणि नंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या बायकोचा विश्वासघात

दुसरीकडे, वरात येण्याची वाट पाहत असलेल्या नववधूने रोहित आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपला विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. तिला रोहितचा पहिला विवाह झाल्याची पुसटशीही कल्पना नव्हती, असा दावा तिने केला आहे, यासाठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही तिने केली आहे. या घटनेनंतर वधूची प्रकृती बिघडली आहे.

पोलिसात अद्याप अधिकृत तक्रार नाही

भवन कुंड पोलिस चौकीचे अधिकारी जमील यांनी सांगितले की, डायल 112 वर तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.