नवी दिल्ली : हरियाणात भडकलेल्या हिंसाचारामध्ये एका इमामाची हत्या करण्यात आली. हाफिज साद असं इमामाच नाव आहे. तो बिहारच्या सीतामढीचा निवासी आहे. गुरुग्रामच्या सेक्टर 57 मध्ये असलेल्या मशिदीमध्ये हाफिज सादची हत्या करण्यात आली. हा इमाम सीतामढी जिल्ह्याच्या नानपूर प्रखंड येथील मनियाडीह गावचा राहणारा होता. समाज कंटकांनी मशिदीमध्ये घुसून त्याची हत्या केली. इमामच्या मृत्यूनंतर संपूर्ण गाव शोकमग्न आहे.
हाफिज साद 1 ऑगस्टला सीतामढ़ीमधील मनियाडीह या आपल्या गावी येणार होता. त्याने तिकीटही काढली होती. पण 31 जुलैच्या रात्री उपद्रवींनी चाकूने भोसकून त्याची हत्या केली. या घटनेनंतर गुरुग्रामच्या स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतलय.
मशिदीत इमाम म्हणून कधीपासून काम सुरु केलेलं?
मुलाच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर हाफिज सादची आई सनोबर खातून यांची खूप वाईट अवस्था आहे. त्यांची स्थिती पाहून अनेकांच काळीज हेलावलं. डिसेंबर 2022 पासून गुरुग्रामच्या मशिदीत तो इमाम होता. मंगळवारी रात्री त्याचा मृतदेह गावच्या घरी आला. बुधवारी दफन विधी झाला. यावेळी लोकांच्या डोळ्यात अश्रू होते.
लोकांच्या मनात राग
इमामच्या हत्येनंतर अख्खं गाव शोकमग्न आहे. कुटुंबीय आणि गावातील लोकांच्या मनात राग आहे. इमामच्या मृत्यूनंतर वडिल मोहम्मद मुस्ताक म्हणाले की, 1 ऑगस्टला मोहम्मद हाफिज साद गावी येणार होता. त्याने तिकीटही काढलं होतं.
पायाखालची जमीन सरकली
31 जुलैच्या रात्री 12 वाजता हाफिज सादची हत्या झाली, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. आम्हाला या बद्दल समजल्यानंतर आमच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण गाव दु:खात बुडालं आहे.