पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायला गेला, पण डाव त्याच्यावरच उलटला…

या प्रकरणात आरोपी पोलिसांची दिशाभूल करत राहिला पण शेवटी तो त्याच्याच रचलेल्या प्लानमध्ये अडकला आणि संपूर्ण घटना उघडकीस आली.

पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायला गेला, पण डाव त्याच्यावरच उलटला...
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 4:24 PM

हिसार | 21 ऑक्टोबर 2023 : हरियाणातील हिसारमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या (murder news) करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक कथा रचली, मात्र ऐनवेळी त्याचा जबाब बदलल्यामुळे तो अडकला. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश केला. हा धक्कादायक प्रकार हिसारमधील मांगली गावात घडला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा प्लान फसला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अमित असे आरोपीचे नाव आहे.

हिसारमधील मांगली गावात एका व्यक्तीने पत्नीचा गळा दाबून आणि डोक्यावर विटांनी वार करून खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याने तोशाम गावातील शेतात मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी पाच दिवसांनंतर शुक्रवारी तोशाम येथून त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे काही भाग जनावरांनीही खाल्ले होते. हत्येनंतर आरोपीने त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार आझाद नगर पोलिस ठाण्यात नोंदवली. पत्नी बेपत्ता झाल्यामुळे, शोकाकुल होण्याचे, तसेच विष प्राशन करण्याचे नाटकही त्याने केले.

पण पोलिसांना आरोपीच्या वागण्यावर आणि त्याच्या जबाबावर संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपीने आपणच आपल्या पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, असे प्राथमिक तपासात समोर आले. आझाद नगर पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगली गावात राहणारा अमित हा शेती करतोले होते. सात वर्षांपूर्वी अमितचा अनितासोबत विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत. अमितची एक मुलगी ही तिच्या आत्याकडे राहते. 15 ऑक्टोबर रोजी अमितचे वडील हे आत्याकडे राहणाऱ्या नातीच्या शाळेची फी देण्यासाठी गेले होते. तर अमितची आई आणि त्याची इतर दोन मुलं हे दुसऱ्या खोलीत झोपले होते. तेव्हाच अमितने त्याची पत्नी अनिता हिचा गळा दाबला आणि तिच्या डोक्यावर वीटेने वार करून हत्या केली.

त्यानंतर मृतदेह एका गाठोड्यात बांधून तो कारमध्ये टाकून घेऊन गेला. त्यानंतर तोशाम येथील बायपासवरील झुडपात त्याने पत्नीचा मृतदेह फेकून दिला. कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी त्याचं नाक ओळखून प्लान हाणून पाडला आणि अटक केली.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.