Video : ‘चल, निघ चल! बाहेर निघ’ महिला पोलीस अधिकाऱ्यावर का भडकल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष?

पुरुषाची एकदाही वैद्यकीय चाचणी का केली नाही? यावरुन महिला आयोगाच्या अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. 'तुम्ही त्याच्या कानशिलात लगावली असती का? निघून जा बाहेर' असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस अधिकारी महिलेस दम भरला.

Video : 'चल, निघ चल! बाहेर निघ' महिला पोलीस अधिकाऱ्यावर का भडकल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष?
नेमकं असं काय झालं संतापायला?Image Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 12:20 PM

हरियाणामधील महिला आयोगाच्या अध्यक्ष (Haryana Women Commission) यांनी एका पोलीस अधिकारी महिलेवर (Lady Police Officer) कमालीच्या संतापल्या होत्या. संतापलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी इतर पोलिस अधिकाऱ्यांसमोरच महिला पोलिसाला झापलं. हा सगळा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका स्थानिक पत्रकाराने आपल्या मोबाईल ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला पोलीसही महिला आयोगाच्या अध्यक्षांना प्रत्युत्तर देताना दिसून आली आहे. या दोघींमध्ये उडालेले शाब्दिक खटके चर्चेचा विषय ठरलेत.

महिला आयोगाकडे दाखल झालेल्या एका खटल्या प्रकरणी बैठक सुरु होती. त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रेणू भाटिया यांनी दुसऱ्या एका पोलीस अधिकारी महिलेला सुनावलं. तक्रारदार महिलेची तीन वेळा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पण पुरुषाची एकदाही वैद्यकीय चाचणी का केली नाही? यावरुन महिला आयोगाच्या अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. ‘तुम्ही त्याच्या कानशिलात लगावली असती का? निघून जा बाहेर’ असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस अधिकारी महिलेस दम भरला.

हे सुद्धा वाचा

यावेळी पोलीस अधिकारी महिलेनेही प्रत्युत्तर दिलं. तिने बाहेर जाण्यास नकार दिला. तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी इतर अधिकाऱ्यांना तिला बाहेर घेऊन जायला सांगितलं. इतकंच नाही, तर तुमची विभगीय चौकशीही होईल, असा इशारा देखील दिला.

या सगळ्यात दुसऱ्या एका महिला पोलिसाने हस्तक्षेप करत पोलीस अधिकारी महिलेला आवरण्याचा प्रयत्न केला. या पोलीस अधिकारी महिलेला पकडून तिला खोलीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यावर पोलीस अधिकारी महिलेनंही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. आम्ही सुद्धा स्वतःचा अपमान करुन घ्यायला इथं येत नाही, असं म्हणत पोलीस अधिकारी महिलेनं महिला आयोगाच्या अध्यक्षांना सुनावलं.

पाहा व्हिडीओ :

याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रेणू भाटिया यांना नंतर माध्यमांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपलं सविस्तर म्हणणं मांडलं. एका कौटुंबीक वादाची तक्रार महिला आयोगाकडे आली होती. एका महिलेचा पती तिच्यासोबत गैरवर्तवणूक करत असल्याची तक्रार दाखल झाली होती. पत्नीला सोडून देण्यासाठी पती तिच्या अनफिट असण्याचं कारण देत होते. याप्रकरणी महिला आयोगाने पती आणि पत्नी दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले होते, असं भाटिया यांनी म्हटलंय.

पाहा लाईव्ह घडामोडी : व्हिडीओ

विशेष म्हणजे या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आलेल्या पोलीस अधिकारी महिलेनं फक्त पीडित पत्नीचीच वैद्यकीय चाचणी केली होती. एक-दोनदा नाही तर तब्बल तीन वेळी पीडितेची चाचणी करण्यात आली. पण पुरुषाची एकदाची चाचणी न करण्यात आल्यानं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पोलीस अधिकारी महिलेला चांगलं फैलावर घेतलं होतं. दरम्यान, याप्रकरणी अद्याप पोलीस अधिकारी महिलेचं कोणतंही स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही. एकूणच या बाचाबाचीत वातावरण चांगलंच तापलं होतं.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.