बकऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपीवर बलात्कार आणि खूनाचा गुन्हा सिद्ध, नराधमाला आजीवन कारावास

एका सात मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. आरोपीचा शोध लागत नव्हता, अखेर बकऱ्यांमुळे आरोपी सापडला.

बकऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपीवर बलात्कार आणि खूनाचा गुन्हा सिद्ध, नराधमाला आजीवन कारावास
अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 2:53 PM

हरियाणा | 18 ऑगस्ट 2023 : हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील एका गावात एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीवरील गुन्हा सिद्ध होण्यात बकऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. या प्रकरणातील आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. चार वर्षे जुन्या प्रकरणात आरोपीवर नूंह कोर्टाने वेगवेगळ्या कलमांखाली आरोपपत्र दाखल करीत 75 हजार रुपयांचा दंड देखील सुनावला आहे.

हरियानाच्या नूंह जिल्ह्यात 26 डिसेंबर 2019 रोजी एका व्यक्तीने सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करीत तिची हत्या केली होती. या अल्पवयीन बालिकेच्या पित्याने 27 डिसेंबर रोजी फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला.

झुडुपात मृतदेह सापडला

या प्रकरणातील सरकारी वकील आकाश तंवर यांनी सांगितले की मुलीच्या पित्याने तक्रारीत म्हटले होते की त्यांची सात वर्षीय मुलगी रोजच्या सारखी 26 डिसेंबर 2019 रोजी गावानजिकच्या डोंगरात बकऱ्यांना चरायला घेऊन गेली होती. ती घरी न परतल्याने दुसऱ्या दिवशी गावातील अन्य रहीवाशांच्या मदतीने शोधाशोध केली तर झुडपांमध्ये तिचा मृतदेह आढळला.

अखेर आरोपीची ओळख पटली

घटनेचा तपास करताना पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातीस सर्व सीसीटीव्ही तपासले. ज्यात एक युवक बकऱ्यांना घेऊन जाताना दिसत आहे. पीडीताच्या वडीलांना हे सीसीटीव्ही फुटेज दाखविले तेव्हा त्यांनी त्यांच्या बकऱ्यांना ओळखले. त्यानंतरच आरोपीची ओळख पटली. या प्रकरणी मुकीम उर्फ मुक्की याला अटक करण्यात येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करीत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Non Stop LIVE Update
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?.
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी.
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा.
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा.
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले....
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले.....
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात.
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला....
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला.....
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?.
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?.
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.