Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने ‘लिव्ह इन पार्टनर’चा खून केला, मृतदेह फ्रिजमध्ये लपवला आणि त्याच दिवशी दुसरीशी लग्न केले

निक्की यादव ( वय 25 ) ही हरीयाणाच्या झज्जारची रहिवासी आहे. निक्कीची साहील गेहलोत याच्याशी बसच्या प्रवासात ओळख झाली. जेव्हा तो दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उत्तम नगर येथील एका कोचिंग क्लासला जात होता.

त्याने 'लिव्ह इन पार्टनर'चा खून केला, मृतदेह फ्रिजमध्ये लपवला आणि त्याच दिवशी दुसरीशी लग्न केले
निक्की यादव हत्याकांडात साहिलच्या कुटुंबाचाही हातImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 8:18 AM

दिल्ली : एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना ढाब्याच्या फ्रिजरमध्ये लपवलेला सापडला होता. या प्रकरणात पोलीसांनी 24 वर्षीय ढाबा मालकाला अटक केली आहे. साहील गेहलोत असे आरोपी ढाबा मालकाचे नाव असून त्याने त्याची ‘लिव्ह इन पार्टनर’  25 वर्षीय तरूणी निक्की यादव हीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबूली पोलीसांनी दिली आहे. निक्कीचा दुसऱ्या मुलीशी विवाह करण्यास विरोध होता त्यामुळे तिचा अडसर दुर करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलीसांना सांगितले.

दिल्लीच्या नजफगड परिसरातील एका ढाब्याच्या फ्रिजरमध्ये मंगळवारी महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर तपासाची चक्रे फिरून पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे. आरोपीने खून केल्यानंतर दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याचे उघडकीस आले आहे. साहील गेहलोत याने 9-10 फेब्रुवारीच्या रात्री निक्कीची हत्या केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. तिने लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे त्याने त्याच्या कारमधील डाटा केबलने तिचा गळा आवळून तिला ठार केल्याचे स्पष्ठ झाले आहे. निक्कीचा दुसऱ्या मुलीशी विवाह करण्यास विरोध होता त्यामुळे तिचा अडसर दुर करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलीसांना सांगितले.

बसच्या प्रवासात ओळख झाली

निक्की यादव ( वय 25 ) ही हरीयाणाच्या झज्जारची रहिवासी आहे. निक्कीची साहील गेहलोत याच्याशी बसच्या प्रवासात ओळख झाली. जेव्हा तो दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उत्तम नगर येथील एका कोचिंग क्लासला जात होता त्याचवेळी निक्की यादव याच परिसरातील आकाश इन्स्टिट्यूट मधून मेडीकलच्या एन्ट्रस एक्झामचीही तयारी करीत होती. त्यावेळी त्या दोघांची एकाच बसमधून प्रवास करताना ओळख झाली त्यातून त्या दोघांचे प्रेम झाले. ते कोचिंग क्लास झाल्यानंतर एकमेकांना भेटू लागले.

दोघांची अनेक पर्यटन स्थळांना भेट

फेब्रुवारी 2018 मध्ये ग्रेटर नोयडा येथील गलोटीया इन्स्टिट्यूटमधून दोघांनी वेगवेगळ्या कोर्ससाठी प्रवेश घेतला, त्यानंतर ते दोघे भाड्याच्या घरात एकत्र राहू लागले. त्या दोघांनी मनाली, रिषीकेश, हरिद्वार आणि डेहराडून येथे एकत्र प्रवास केल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. प्राथमिक तपासात 9 आणि 10 फेब्रुवारीच्या रात्री आरोपीने निक्की यादव हीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने कारमध्ये त्याच्या मोबाईलच्या डेटा केबलने तिचा गळा आवळला. त्यानंतर त्याच्या ढाब्यामध्ये जाऊन तिचा मृतदेह लपवला. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पोलीसांनी ढाब्यातून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी बाबा हरीदास नगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.