पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते, परंतू एका चुकीने फरार आरोपीला 25 वर्षांनंतर गुजरातमधून अटक झाली
मुंबई पोलिसांकडे त्याचे ताजे छायाचित्रही नव्हते आणि पत्ताही नव्हता आता त्याला शोधायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला. परंतू आरोपीची एक चुक त्याला नडली.
मुंबई : एका चिटींग केसचा आरोपी फरार होऊन तब्बल पंचवीस वर्षे गुजरातला लपला होता. त्याने कोर्टाच्या तारखांना हजर राहणे बंद केले होते. त्यामुळे कोर्टाने त्याला फरार म्हणून घोषीत केले होते. अखेर पंचवीस वर्षांनी पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले तेव्हा आरोपीला मोठा धक्का बसला. पोलीस आपल्यापर्यंत कधीकाळी पोहचतील असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतू प्रत्येक गुन्हा करताना आरोपी काही ना काही पुरावे मागे ठेवत असल्याने पोलीस त्याच्यापर्यंत पोहचलेच..
रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी गुरूवारी गुजरातच्या भरूच येथून चिटींग प्रकरणातील 62 वर्षीय अहमद अजित पटेल यांना पकडल तेव्हा त्यांना धक्काच बसला. गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अमोद तालक्यात आरोपी अहमद पटेल यांनी आपली दुसरे आयुष्य सुरू केले होते. पोलिसांकडे आरोपीचे फोटो आणि पत्ता नसल्याने इतक्या वर्षांनी त्याला शोधून काढणे अवघड बनले होते.
1998 मध्ये दादरच्या फोटो क्लीप इंडीया लि. कडून कॅमेऱ्यांसाठी पन्नास हजाराचा चेक अहमद यांनी दिला होता. हा चेक सौराष्ट्र बॅंकेच्या मालाड परिसरातील शाखेचा होता. तक्रारदारांला मालाडमध्ये अशा बॅंकेची कोणतीही शाखा नसल्याचे कळल्यानंतर आपली फसगत झाल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. पटेल आणि त्याचा साथीदार जनक ढोलकीया यांना पोलिसांनी अटक केली. कोर्टातून जामिन मिळताच पटेल फरार झाला. नंतर त्याला शोधण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतू उपयोग झाला नाही. त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता.
काही वर्षांनी पोलिसांना त्याच्या सहकाऱ्याकडे त्याचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्याच्याआधारे पोलिकांनी बॅंक अधिकारी बनून केवायसी अपडेट करायची आहे असा कॉल केला. परंतू त्याला संशय आल्याने अखेर त्याने आपला ठिकाणा बदलला. मुंबई पोलिसांकडे त्याचे ताजे छायाचित्रही नव्हते आणि पत्ताही नव्हता आता त्याला शोधायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला.
मुंबई पोलीसांनी अखेर त्याच्या मित्रांकडून त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याचा मोबाईल क्रमाक कुठल्या मोबाईल एपशी संलग्न आहे का पाहिले. त्यानंतर पेटीएम हा क्रमांक संलग्न असल्याचे कळले. त्यानंतर बॅंक डीटेल्स काढण्यात आले. त्यातून त्याचे छायाचित्र आणि पत्ता मिळविळ्यात अखेर यश आले आणि गुजरातच्या आमोद पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केले. अशाप्रकारे 25 वर्षांनंतर आरोपीला वर्षांनंतर पेटीएम खात्यामुळे अटक करण्यात यश आल्याचे हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.